Mhasla I गोरगरिबांचे देवदुत डॉ.प्रशांत गायकवाड यांचे दुःखद निधन 

म्हसळा – सुशील यादव

 

तालुक्यात सर्व परिचित गोरगरिबांचे देवदूत ठरलेले रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड यांचे दिनांक १८/६/२०२४ रोजी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय अवघे ४८ वर्षे होते.त्यांचे पश्चात पत्नी,लहान मुलगा,मुलगी आणि आप्तेष्ट परिवार आहे.सदैव हसतमुख

परोपकारी,मनमिळावू,सेवाभाव वृत्ती असलेले आणि मित्र परिवारत रममाण असलेले डॉ.प्रशांत गायकवाड यांची सन २००६ मध्ये म्हसळा तालुक्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून शासन नियुक्ती झाली होती.मधल्या काळात त्यांनी म्हसळा तालुक्यात प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून चांगले काम केले होते.

कोरोना काळात त्यांनी वैद्यकिय क्षेत्रात झोकुन काम करत गोरगरीबांना चांगली आरोग्य सेवा दिली होती.मुंबई वरळी येथील मुळ निवसी डॉ.प्रशांत गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने म्हसळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय क्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी वृंद,लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ आणि मित्र परिवार यांनी शोक व्यक्त करत भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *