Rajratna Ambedkar I देशात 2024 मध्ये सत्ता बदलली नाही, तर सिवील वॉर होईल – राजरत्न आंबेडकर 

अभ्यासक्रमात लहानपणापासून मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील- राजरत्न आंबेडकर

400 पारचा नारा, संविधान बदलण्यासाठी, हे कारस्थान 2014 पासून सुरु – राजरत्न आंबेडकर यांचा घणाघात

पूर्वीच्या शिक्षणप्रणालीत आय ए एस , आयपीएस बाहेर पडायचे, आता आर एस एस चे कार्यकर्ते बाहेर पडतात- राजरत्न आंबेडकर

भिम महोत्सवात राजरत्न आंबेडकर यांनी मांडले दिशादर्शक परखड विचार

रायगड (धम्मशील सावंत) लोकशाहीचे स्तंभ ढासळायला लागले असून देशाची वाटचाल हुकूमशाही च्या दिशेने होत आहे. अभ्यासक्रमात लहानपणापासूनच मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील अशी चिंता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली.

             रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सालाबादप्रमाणे सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन दि. ३१ मे व 1 जून 2024 असा दोन दिवसीय भव्य दिव्य असा भिम महोत्सवाचें आयोजन करण्यात आले होते. भिम महोत्सव निमित्ताने विविदग वैचारीक, प्रबोधनात्मक ,कार्यक्रम घेण्यात आले. प्रमुख वक्ते, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष , डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना आपल्या विशेष शैलीत मौलिक आणि दिशादर्शक मार्गदर्शन केले.

तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, शाहीर आणि प्रबोधनकार राहुल अनविकर यांचा बुद्ध भिम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला.राजरत्न आंबेडकर म्हणाले की भाजपला चारशे पार जायचं आहे कारण की त्यांना भारतात मोठे संविधानिक बदल करायचे आहेत.

370 चा आकडा टू थर्ड हे संख्याबळ घेऊन त्यांना संविधान बदलायचे आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी आणी भाजप चा हा अजेंडा उघड झाला आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या देशावर राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे अशी ऑफीसियल स्टेटमेंट केली आहे. यावरून त्यांचं मिशन स्पष्ट होतोय.

अभ्यासक्रमात, पाठय पुस्तकात

मनुस्मृती आणण्याच्या भूमिकेवर राजरत्न आंबेडकर यांनी परखड मत मांडले आहे. आंबेडकर म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विधान आहे की शिक्षण हे वर्णव्यवस्थेला जातीयतेला उखडून फेकतील अशा लोकांचं झालं पाहिजे. जे लोक मनुस्मृती व वर्णव्यवस्था लागू करतील ते लोक ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ते आयुक्षभर प्रयत्न करतील.

मनुस्मृती पाठयपुस्तकात लागू केली जाते कारण मनुस्मृती चे समर्थक या देशात तयार होतील. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील, आज परिस्थिती पहा मनुस्मृती लागू करून मनुस्मृती चे समर्थक वाढवले जातात, आता धर्म धिष्टीत शिक्षण लहान पणापासूनच गुलामी एन्जॉय करणारी पिढी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पूर्वीच्या शैक्षणिक क्षेत्रात आय ए एस, आय पी एस, डॉक्टर, इंजिनियर, वकील बाहेर पडायचे आत्ताच्या शिक्षण प्रणालीतून आर एस एस चे कार्यकर्ते बाहेर पडतात.असे आंबेडकर म्हणाल्या.

आम्ही विद्यार्थी दशेत असताना प्रशासन, महाविद्यालयाच्या विरोधात आमचे भांडायचे मुद्दे होते की आम्हाला पुस्तक मिळत नाहीत, लेक्चर होत नाहीत, तर आत्ताचे मुद्दे हे आहेत की हिजाब घालायचा की नाही, की भगवे घालायचे की नाही हे मुद्दे पुढे आलेत, यातूनच मनुस्मृती चे समर्थन करणारे कार्यकर्ते घराघरात निर्माण होतील अशी चिंता आंबेडकर यांनी व्यक्त केली.

Rajratna Ambedkar
Rajratna Ambedkar

भारताची लोकशाही धोक्यात आहे, हे सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशानी जाहीर केल. लोकशाहीचे चार स्तंभ न्यायपालिका, कार्यपालिका, संसद, प्रसार माध्यमावार आर एस एस ने कब्जा केला आहे. एकही टीव्ही चैनल आमचे मुद्दे मांडणारे नाही. संसदेत चारशे पार चा नारा लावून संविधान बदलविण्याचे, हुकूमशाही लादण्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून दबाव तंत्रातून विरोधक संपवले जात आहेत.

भाजपचा वन नेशन वन पॉलिटिशन चा प्लॅन आहे. असा गंभीर आरोप राजरत्न आंबेडकर यांनी केला. आंबेडकर जयंतीत कोट्यवधी चा खर्च होतो, याबरोबरच आम्ही आपल्या हक्काच्या बँका, शैक्षणिक संस्था, धम्म केंद्र उभे करण्यासाठी येत्या काळात चळवळ गतिमान केली पाहिजे असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

Rajratna Ambedkar
Rajratna Ambedkar

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनुस्मृती चे समर्थन करून संविधान विरोधी भूमिका दर्शवली, मनुस्मृती नुसार येणारी स्त्री गुलामी त्या स्वीकारतील का असा सवाल राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर दिलेला 58 टक्के हा मतांचा आकडा वाढला आहे, तो कसा वाढला हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला, याच उत्तर निवडणूक आयोगाला देता आला नाही. अविकसित देशात ई व्ही एम मशीनचा वापर केला जातं आहे, मात्र विकसित देशात मशीनचा वापर न होता तिथे बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या जातात.

Rajratna Ambedkar
Rajratna 
Rajratna Ambedkar
Rajratna Ambedkar

इतर देशात आज बॅलेट पेपर वर मतदान, आणी दुसऱ्या दिवशी निकाल दिला जातो. मात्र इथे इव्हीएम वर मत घेऊन मशीन सेक्टर मध्ये बंद ठेवून नंतर निकाल दिला जातो, ज्या पद्धतीने देशातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन काळा कायदा उलथून लावला तसेच मतदारांनी एकत्र येऊन इव्हीएम मशीन उलथून लावली तरच लोकशाही मजबूत होईल असे आंबेडकर म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होते की आपण जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. बौद्ध म्हणून पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री हे आय एम बुद्धा नावाने परदेशात जाऊन बौद्ध म्हणून पैसे उकळत असल्याचा आरोप राजरत्न आंबेडकर यांनी केला.

आम्ही खरे बौद्ध विविध जातीत न विखरता जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. आज आम्ही भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून बौद्ध राष्ट्रातून आम्ही आपले अधिकार आणत आहोत. वल्ड फिलोशिप ऑफ बुद्धीष्ट ही 138 देशाच्या संघटनेत आपली संस्था पुनर्जीवीत करून आज जगाच्या पटलावर आम्ही बौद्धाच्या समस्या मांडत आहोत.

इतर देशात बौद्ध धम्म हा पुतळे, मुर्त्या, आणी विहारात नसून बुद्ध तत्वज्ञान त्यांनी अंगीकारले आहे. बुद्ध तत्वज्ञान जीवनात अंगीकारली तरच आमची संघटन शक्ती वाढून प्रगती होईल.असे आंबेडकर म्हणाले.

गड किल्ल्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी, अधिकार संभाजी राजे यांना दिले आहेत, त्याप्रमाणे या देशातील बौद्ध लेण्या, स्तूप संवर्धन जतन करण्याची जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय बौद्ध संस्थेला द्यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. या भीम महोत्सव 2024 या कार्यक्रमास

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, जिवण गायकवाड, किशोर गायकवाड, अंकुश सुरवसे, विजय गायकवाड, गणेश कांबळे, अशोक गायकवाड, अलकाताई सोनवणे, सुरेखाताई कांबळे, , नितीन सोनावणे, जगदीश शिंदे, निलेश गायकवाड, अक्षता गायकवाड, अध्यक्ष शैलेश पवार, दौलत ब्राम्हणे, के के गाडे, मनोहर ढोले, उमेश गायकवाड, सचिन भालेराव, सचिन गायकवाड, सुनिल गायकवाड, गणपत गायकवाड, विश्वनाथ बडेकर, आदींसह उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी , भिम अनुयायी, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *