पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळवणारे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे रायगडात जंगी स्वागत करण्यात आले. खालापूर टोल नाक्यावर रिपब्लीकन कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

सलग तिसऱ्यांदा केंद्रिय मंत्रीपद मिळवलेला आपला लाडका नेता मुंबई पुणे महामार्गावरील खालापूर टोल नाक्यावरून जाणार आहेत ही बातमी समजताच रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व खालापूर, कर्जत, पेण, सुधागड तालुक्यातील आरपीआयचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते खालापूर टोल नाक्यावर त्यांच्या स्वागताला जमले होते.

केंद्रीय मंत्री तथा आरपीआय नेते रामदास आठवले यांचे खालापूर टोल नाक्यावर प्रवेश होताच आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या गळ्यात मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत केले.

यावेळी ” रामदासजी आठवले साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है…” “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो..” अशा घोषणा देत आणि फटाके वाजवत आठवले साहेबांचे जंगी स्वागत करण्यात आले. साहेब तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदी विराजमान झाल्याने जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आठवले साहेबांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला.
तसेच सर्व कार्यकर्त्यांनीदेखील मिठाई वाटप करून तोंड गोड करीत आनंद व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांची विचारपूस करून सर्वांचे आभार व्यक्त करीत आपल्या पुढील कार्यक्रमाच्या दौऱ्याला निघून गेले.
यावेळी या स्वागताच्या प्रसंगी आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राहुल डाळिंबकर, सुमित सुर्वे, कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, अशोक गोतरणे, कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड, सूर्यकांत कांबळे खालापूर युवक अध्यक्ष सुनील सोनावणे, पंकज सोनावणे, प्रवीण महाडीक, किशोर निकाळजे, नरेश जाधव, अमर जाधव, नितीन वाघमारे, रुपेश रूपवते, सनिल गायकवाड, शैलेश धनगावकर, नरेश जोशी, चिंतामण कांबळे, संदीप गायकवाड, जगदीश कांबळे, नागेश बाविस्कर, तुळशीराम डोंगरे, किसन सोनावणे, सागर केदारी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.