आता आमचं ठरलय विकासाला मतदान,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभुतपूर्व निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.

समाजाच्या नावावर ५ वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांनी ३० वर्षांचा कामाचा लेखाजोगा समोर आणावा – खासदार सुनिल तटकरे यांनी मतदार संघातील मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात दिले आवाहन.

 आता आमचं ठरलय विकासाला मतदान,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभुतपूर्व निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.

 

म्हसळा – सुशील यादव

 

देशात होणाऱ्या ५ टप्प्यातील लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येवू लागल्या आहेत तसतसा राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचार सभा व बैठकांचा जोर वाढला आहे.तिसऱ्या टप्प्यातील ७ मे रोजी पार पडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या ३२ रायगड लोकसभा निवडणुकीत सेना,भाजप युती मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उमेदवार आहेत तर त्यांचे विरूद्ध इंडी आघाडीचे उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते यांच्यात थेट लढत होणार आहे.अटीतटीच्या लढतीत आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.दिनांक ३१ मार्च रोजी श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा,तळा आणि श्रीवर्धन मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा तालुकानिहाय निर्धार मेळावा मुंबई दादर येथील श्री कृष्ण सभागृहात पार पडला.मेळाव्याला युतीचे उमेदवार म्हणून खासदार सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना इंडी आघाडीचे अनंत गीते माझ्यावर मा.पवार साहेब आणि बॅ.अंतुले यांचा विश्वासघात केला असल्याची टिका करतात यावर तटकरे यांनी सडेतोड उत्तर देताना टिका टिपण्णी करणे माझा धर्म नाही पण वेळेला नेतृत्वात बदल झाला असेल तर लोकांची सेवा करण्यासाठी नेतृत्त्वात बदल हे होतच असतात.आम्ही विकासाचे नविन पर्व,चालना देण्यासाठी आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी राजकिय सत्तेत आलो आहोत असे स्पष्ट करताना तुम्हाला लोकांनी ५ वेळा निवडून खासदार व मंत्री केले असे असताना तुम्ही विकास न करता जनतेचा विश्वासघात केलात.कुणबी समाजाचे नावावर निवडून आलात पण हे करत असतानाच तुम्ही स्वतःचे सावलीला घाबरलात.समाजाचा एकही मोठा कार्यकर्ता घडवला नाहीत.तुम्हाला वाटत दुसरा मोठा झाला तर माझे काय होईल असाच त्या मागिल उद्देश असावा असा राजकीय घणाघात तटकरे यांनी केला.मी माझे कार्यकाळात कुणबी समाजाचे नेतृत्वाला वेगवेगळया संस्थांवर विराजमान केले आहे या वेळी तटकरे यांनी व्यासपीठावरील अनेजणांची पद निहाय नावे सांगितली.विरोधी उमेदवार अनंत गीते यांनी समाजाच्या नावावर ५ वेळा खासदार,१० वर्षे केंद्रीय मंत्री तेही कॅबिनेट अशा प्रदीर्घ ३० वर्षांच्या मागील कामाचा लेखाजोगा समोरा समोर आणावा मी माझ्या ५ वर्षांचा लेखाजोगा समोर ठेवतो म्हणजे लोकांशी विकासाची गल्लत कोणी केली ते निदर्शनात येईल असा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी या वेळी केला.कुणबी समाज नेते शामराव पेजे यांच्या नेतृत्वाखाली १०० वर्षा पुर्वी कुणबी समजोंन्नती संघाची स्थापना करण्यात आली.समाजाची मुंबई येथे मुलुंड सारख्या ठिकाणी बॅरिस्टर अंतुले यांनी जमीन संपादन करून दिली येथे समजाचे भव्य संकुल उभारण्यासाठी आपल्या प्रयत्नाने ५ कोटी रुपयांचा शासन निधी उपलब्ध करून दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच कामासाठी ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.आता समाजाचे मालकीचे भव्य संकुल उभारण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून देताना रत्नागिरी,सिंधूदुर्ग जिल्ह्यात बेदखल कुलांचा कायदा अस्तित्वात आणताना माझा खारीचा वाटा होता अशी माहिती म्हसळा मुंबई वाशियाना करून दिली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे पार पडलेल्या म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य निर्धार मेळाव्यात”आता आमचं ठरलय,विकासाला मतदान”अर्थात खासदार सुनिल तटकरे यांनाच मतदान अशी म्हसळा तालुका मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपन्न निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांनी टॅग लाईन मारत जाहिर घोषणा केली.मेळाव्याला खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याच्या महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,मुंबई प्रदेश नेते भास्करदाजी विचारे,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष नाझीमभाई हसवारे,तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती बबन मनवे,मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश शिर्के,जेष्ठ नेते अंकुश खडस, जयंत चीबरे,महेश घोले,शाहीद उकये,उपाध्यक्ष रविंद्र तटकरे,सचिव सुनिल महाडीक,मदनभाई वाजे,कुणबी समाज नेते राजाराम गावडे,श्री टिंगरे,रुपेश पाटील,रफिक घरटकर,नवाब कौचाली 

आदी मान्यवर उपस्थित होते.मेळाव्याला मुंबई निवासी म्हसळा तालुक्याची उपस्थिती पाहून खासदार सुनिल तटकरे यांनी काम करीत असल्याचे समाधान व्यक्त करतांना वडिलांचे निधना नंतर ४० वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामांचा उपस्थितांसमोर आढावा ठेवला.धर्म निरपेक्ष भावनेने काम करीत गाववाडी वस्तीवर वीज,पाणी,रस्ते,समाज मंदीर,शैक्षणीक,आरोग्य सारख्या मुलभूत सुविधेची कामे केली आहेत आता आपल्याला उद्याचे भविष्यातील स्थलांतर थांबवून प्रदूषण विरहीत कारखानदारी आणावी लागणार आहे.सन २००९ पासुन निसर्गाचे वरदान लाभलेल्या म्हसळा श्रीवर्धन मतदार संघात पाच वर्षात पर्यटन विकासाला प्राधान्य देत तालुक्यांतील मोठ मोठे जोड रस्ते,सागरी पुल उभारणी साठी पाच हजार कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.या कामी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानताना बॅ.अंतुले यांचे रेवस रेड्डी सागरी मार्ग करण्याचे स्वप्न आता पुर्तीस जाणार आहे. कोरोणा काळात,निसर्ग चक्री वादळात,पुरपरस्थितीचे काळात मतदार संघातील लोकांसाठी केलेल्या मदतीची आठवण करून देताना शासस्तरावरून निकष बदलुन सरसकट मदत देताना तळा तालुक्यात १९ कोटी रुपयांची तर म्हसळा तालुक्यांत तब्बल ५४ कोटी रुपये इतका शासन निधीची मदत करण्यात आली आहे.विकास कामे करीत राहू ती होतीलच परंतु आता निवडणुकीच्या कामाला लागा युती सरकार मधील रायगड जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे आमदार,मंत्री,नेते यांची तटकरे यांनी नावे घेत कामाला लागले असल्याचे सांगताना त्यांचे मतदार संघात कोण किती लीड देणार याची स्पर्धाच लागली आहे.आजच्या मेळाव्याचे प्रतिसादा प्रमाणे येणाऱ्या ७ मे रोजी मतदानाचे दिवशी राजकीय रणांगणात मतदान करण्यासाठी उतरा म्हणजे परत कोणाला आपल्या समोर उभे राहण्याची ताकद होणार नाही असे खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मेळाव्यात संवाद साधताना आवाहन केले. आमच्या भूमिकेचा संभ्रम निर्माण करून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.सर्व धर्म समभाव जोपासत युती सरकार मध्ये आम्ही आमची आयडॉलॉजी घेऊन काम करीत आहोत.उद्याचा महाराष्ट्र आणि देशाचे नेतृत्व खंबीर करण्यासाठीच आपण सर्वांनी एक दिलाने काम करावे असेही खासदार सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.मेळाव्यात सुत्रसंचलन सुनिल महाडीक यांनी प्रास्तविक पक्षाचे मुंबई अध्यक्ष महेश शिर्के यांनी तर आभार आमदार अनिकेत तटकरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *