गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी..

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी..

म्हसळा रायगड  धम्मशील सावंत जिल्हा प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे यंदाही फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार श्रीशिवजयंती दिनांक २८ मार्च २०२४ रोजी म्हसळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. गेली बारा वर्षे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून म्हसळा शहरात मशालज्योत आणली जाते तसेच पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिवपालखी मिरवणूक सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान हे शिवविचारांवर चालणारे प्रतिष्ठान आहे. किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी म्हसळा शहरातील सुमारे २५ तरुण ह्यामध्ये सहभागी झाले होते. कुमार स्वामी म्हशिलकर आणि अंकित राजपूत यांनी जवळजवळ १५ ते २० किलोमीटर शिवज्योत धावण्याचा शिवपराक्रम केला.

तसेच कौस्तुभ करडे व विशाल सायकर यांनी शिवपालखीचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी गेली बारा वर्षे सक्षमपणे सांभाळत आहेत व गेली अनेक वर्ष गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे अनेक उपक्रम राबविले जात असून म्हसळा तालुक्यांतील शिवविचारांचा जागर करण्यात प्रतिष्ठानचा फार मोठा वाटा असतो. शिवज्योत आणि शिवपालखी मिरवणूक सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री सचिन करडे, कौस्तुभ करडे, विशाल सायकर, समिर बनकर, प्रितम धिमर, शुभम करडे, सुशिल धिमर, राहूल पोतदार, निलेश करडे, यतिन करडे, निहार बनकर, अंकित राजपूत, स्वामी म्हशिलकर, अनिल काप, सागर गुप्ता, योगेश देऊळकर, आयुष करडे, निकेश कोकचा, श्रेया करडे, बाबू बनकर, स्वप्नील चांदोरकर, श्लोक करडे, सोहम करडे यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *