Satara crime news I म्हसळा तालुका वारळ गावात गो हत्या प्रकरणात चार तर गावठी दारू विक्री प्रकरणात एका आरोपीवर गुन्हा दाखल

 

म्हसळा – रायगड

महाराष्ट्र राज्यात गो हत्या आणि गावठी दारू विक्री बंदी कायदा लागु असतानाही या कायद्याचा मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने रायगड जिल्हयात

तालुका स्तरावर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार वजा गुन्हे दाखल होण्याच्या घटना घडत आहेत.अशाच प्रकारची गो हत्या आणि गावठी दारू विक्री केल्याची घटना दिनांक ३० व २१ जुलै २०२४ रोजी म्हसळा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वारळ गावी घडली आहे.

दोन वेगवेगळ्या घटनेची माहिती म्हसळा पोलिसांकडून घेतली असता गो हत्या प्रकरणात पोलिस कर्मचारी अक्षय दौलत पुरी वय वर्षे २६ यांनी फिर्याद दाखल केले नुसार मौजे वारळ येथील आरोपी जुनेद दाऊद काझी वय वर्षे ३८,मुनाफ रहेमतुल्ला मुकादम – ३९ वर्षे,सकलेन मुस्ताक मुकादम २०,नवाज अहमद अब्दुल करीम काझी वय ५५ वर्षे ह्या चार आरोपींनी वारळ मोहल्ला येथे आरोपी नवाज काझी याचे घराचे परीसरात सकाळी ५ वाजताचे दरम्यान संगनमत करून स्वतःच्या फायद्या करिता शासनाने प्रतिबंध केलेल्या गोवंश जातीचा तांबड्या रंगाचे बैलाची कत्तल केल्याने त्यांना पोलीसांनी मुद्देमालासह रंगेहाथ पकडल्याने त्यांचे वर म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६५/२०२४ भा. द. वि. क.४२९,३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम५,५(सी)९ ,२(प) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध असताना १९६० चे कलम ११( ठ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा प्रकरणी म्हसळा तालुका सहा.पोलिस निरीक्षक संतोष आवटी यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे.अधिक तपास पोलीस उप निरीक्षक डी.व्ही.एडवळे हे करित आहेत. म्हसळा तालुक्यात गो धन चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे.पोलीसांनी गो धन चोरी करणाऱ्या व गो हत्या कायदा मोडणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवलाव्यात अशी मागणी म्हसळा तालुक्यातील गो पालक आणि शेतकरी राजा सातत्याने करीत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत वारळ गावी म्हसळा पोलिसांना आरोपीचे जुने घरात दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी ७.४५ वाजता विनापरवाना गावठी हातभट्टीची ५ ली दारू मिळुन आल्याने पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्र महादेव खोत याचे वर गुन्हा दाखल केला आहे. महीला पोलिस प्रतिक्षा कानवडे, वय वर्षे २४ यांनी फिर्याद दाखल केले नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ६४/२०२४ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) प्रमाणे आरोपीचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी सहा.पोलिस निरीक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली एस.व्ही.विघ्ने अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *