Satara I संवेदनशील दृष्ट्या मानल्या जाणाऱ्या उंब्रज गावात समाजास काळिमा फासणारे कृत्य

उंब्रज:प्रतिनिधी कुलदीप मोहिते

उंब्रज ता. कराड येथील गटारात स्त्री जातीचे पुर्ण वाढ झालेले अर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्याने उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांचा बाॅल गटारात गेल्याने ही घटना उघडकीस आली.

घटनेचे गांभीर्य ओळखून विजय सोनटक्के यांनी उंब्रज पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.दरम्यान घटनास्थळी उंब्रज पोलिसांनी पंचनामा करुन अर्भक ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.

Satara Crime news
Satara Crime news

शवविच्छेदनानंतर अहवालानंतर सदर अर्भकाविषयी अधिकची माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.गटारात मिळालेले अर्भक स्त्री जातीचे असून पुर्ण वाढ झालेले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून ते गटारात असल्याचा संशय असून त्याची दुर्गधी पसरली होती.घटनेचा अधिक तपास उंब्रज पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *