Satara News I अवैध ताडी विक्रेत्यांवर उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांची धडक कारवाई

 

 

उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव

दि. ११/0७/२०२४

रोजी पाली गावाच्या हद्दीमध्ये एका घराच्या आडोश्याला आरोपी सुनिल रमेश यादव वय वर्ष ३२ रा. सध्या उंब्रज मुळ गाव जुने एसटी स्टँड पाटण ता. पाटण जि .सातारा हा विनापरवाना अवैध्य रित्या ताडी विकत असल्याची माहिती उंब्रज पोलीस अधिकाऱ्यांना लागताच सदर ठिकाणी छापा टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच उंब्रज गावच्या हद्दीत यशवंत जाधव हायस्कूलच्या पाठी मागे उत्तर मांड नदी जवळ घराच्या आडोशास आरोपी मधुकर विठ्ठल जाधव वय वर्षे ६५ रा. माजगाव ता. पाटण जि सातारा व २) आरोपी सोन्या उर्फ महेश नथुराम कमाने रा .उंब्रज हे ३० लिटर पांढरे रंगाचे आंबट गुळचट उग्र वासाची प्लास्टिकच्या पिशवी मधे उग्र वासाची ताडी विनापरवाना अवैध्य रित्या विकताना मिळून आले.

दोन्ही ठिकाणीं एकूण १०००/-रू किमतीची ५० लिटर ताडी मिळाल्यामुळे आरोपींवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तरी,पुढील तपास उंब्रज पोलीस स्टेशनचे अधिकारी रवींद्र भोरे करीत आहेत.‌

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *