Satara I म्हसळ्यात पाऊस आला अवकाळी; कुंभार व्यावसायिकांवर संकट आले भारी

शासनाकडे मदतीची मागणी

( सुशील यादव , म्हसळा )

बुधवार दिनांक १५ मे च्या मध्यरात्री आणि गुरुवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी म्हसळा शहर आणि परिसरात वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे म्हसळा शहरांतील कुंभार समाजातील कुंभारकलेच्या विक्रीच्या वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणांत नुकसान झाल्याचे समाजाच्या अध्यक्षा वासंती विठोबा म्हशीलकर आणि श्रीमती लता गजानन परबलकर यानी सांगितले .

मातीच्या वस्तुंमध्ये माठ, रांजण, कुंड्या, मडकी, धार्मिक कार्यक्रमांत लागणारी सुगडी, झाकण्या,एकेरी आणि दुहेरी चुली ह्यावस्तू मोठ्या प्रमाणांत होत्या यामध्ये सौ.वासंती आणि लता व्यतीरीक्त मनाली निलेश परबलकर, विद्या गणेश बिरवाडकर,मानसी महेश म्हशीलकर, वंदना वसंत बिरवाडकर, सुजिता जितेंद्र म्हशीलकर, लिलाबाई गजानन म्हशीलकर, भिकी कलमकर या महिला व्यवसायीकांचे नुकसान झाले . त्यांचे प्रत्येकी किमान ८ ते १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आंदाज संबंधितांन वर्तविला.
या वस्तू कच्च्या मालापासून बनविणे आणि विक्री हे सर्व महिला वर्गच पहात आसतात , आमचे प्रतिनिधी जवळ बोलताना सौ.वासंती आणि लता रडवेल्या झाल्या होत्या त्यांनी कुंभार कामासाठी विशिष्ट प्रकारची माती लागते,माती आधी उन्हात वाळवतात आणि मग कु्टून बारीक करतात. त्यानंतर त्यामध्ये गाईचे शेण – गोमूत्र ,राख, भाताचे तूस , कोळसा पावडर वगैरे कालवून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे छोटे – मोठे गोळे बनवून त्या पासून आवश्यकती कलाकृती बनविली जाते असे लता मावशीनी सांगितले . म्हसळा शहरात स्वतंत्र कुंभार आळी असून समाजाची सुमारे ४० घरे आहेत , महाराष्ट्रातील कुंभार समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद काळापासून कुंभार समाजआहे शासनाने आम्हाला मालाच्या उत्पादन आणि विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्याव्यात नैसर्गिक अपत्तीमध्ये शासनाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे .आम्ही ही मागणी श्रीवर्धनच्या आमदार आणि मंत्री अदीतीताईं तटकरेंकड लावून धरणार आसल्याचे सौ.वासंती आणि लता यानी सांगितले.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्यांना टोळीस अटक 

कुलदीप मोहिते उंब्रज

लोकसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा पोलीस यंत्रणेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रग्रस्त पेट्रोलिंग करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान तळबीड पोलीस ठाणे प्रभारी किरण भोसले, पोलीस कॉन्स्टेबल 893 विभूते, चालक पोलीस कॉन्स्टेबल 24 31 पाटील यांना दिनांक 16/05/2024 रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना उंब्रज गावच्या हद्दीमध्ये शिवडे या गावाजवळील कृष्णा फुलाच्या अलीकडे रोडच्या बाजूस अंधारात 5 इसम संशयइक रित्या हालचाल करताना आढळून आले.

तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले तळबीड यांनी उंब्रज पोलीस ठाणे प्रभारी भोरे यांना संपर्क करून घटनास्थळी मदतीसाठी बोलून घेतले. त्या पाच संशइतांना घेराव घालून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातला एकाला अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यश आले .सदर संशयित इसमांकडे सखोल चौकशी व झाडाझडती केली असता, 3 लहान मोठ्या कटावणी 2) 4 जिलेटिन कांड्या 3) डेटोनेटर 4) लहान बॅटरी )5) एक् सा ब्लेड, करवत, कोयता, ब्लास्टिंग ची वायर, दोन मोटरसायकल ,असे एकूण 137980( एक लाख 37 हजार 980 )रुपयांचे सामान मिळून आले. सदर इसमांकडे सखोल चौकशी केली असता गेल्या आठ दिवसापासून मसूर येथील हिताची कंपनीचे एटीएम सेंटर जेलेटिन कांड्यांद्वारे द्वा स्पो ट घडवून आणून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सदर इसमांनी सांगितले. सदर एटीएमची ते चार-पाच दिवसापासून रेखी करत होते ठरल्याप्रमाणे आज ते दरोडा टाकणार होते परंतु उंब्रज पोलीस स्टेशन व तळबीड पोलीस स्टेशन यांच्या सतर्कतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे खालील प्रमाणे आहेत 1) वैभव राजेंद्र साळुंखे वय ते 33 2) ओकार बाळासाहेब साळुंखे वय 23 3) आदित्य संतोष जाधव वय 19 राहणार मोळाचा ओढा, सातारा 4) विधी संघर्ष बालक 5) पळून गेलेल्या इसमाचे नाव माहीत नाही यांच्यातील वैभव साळुंखे यांच्यावर कोरेगाव, वडूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत .पळून गेलेल्या इसमाची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून चालू आहे.

सदरची कारवाई ही सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईमध्ये तळबीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले पोलीस कॉन्स्टेबल विभूते. पोलीस कॉन्स्टेबल चालक तळबीड पाटील ,तसेच उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरे पोलीस कॉन्स्टेबल साळे, पोलीस कॉन्स्टेबल माने, पोलीस हवलदार धुमाळ हे सामील होते उंब्रज व तळबीड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कामगिरीचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे सदर गुन्ह्याचा तपास हे उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरे करत आहेत.

Satara I कोळेकरवाडी,वनवासवाडी शिवारात भरदिवसा गव्यांचा संचार

 श्रीकांत जाधव, चाफळ

चाफळ विभागात डोंगर माथ्यावर असलेल्या वनवासवाडी,कोळेकरवाडी गावानजीक सावांडा नावाच्या शिवारामध्ये भरदिवसा शिवारात गेलेल्या शेतकऱ्यांना गव्यांचे दर्शन झाले.१५ ते २० च्या कळपांनी आलेल्या गव्यांनी तुडवातुडवी करत नुकसान केले आहे.आठवडाभरात झालेल्या वादळी पावसाने शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे.

शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीस सुरुवात केली आहे. सध्या शेतात शेणखत टाकणे, दगडाच्या ताली रचने,शेतातील कचरा गोळा करणे या प्रकारची विविध कामे चालू आहेत. सध्या कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी दहाच्या आत व दुपारी चार च्या नंतर लोक शिवारात जाणे पसंत करत आहेत.

सकाळी शेत शिवारात कामे करण्यासाठी गेलेल्या लोकांना गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. दिवसाढवळ्या शेत शिवारात गवे संचार करू लागल्याने शेतशिवारात शेतीची मशागतीची कामे कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पठारावर बिनधास्त फिरणाऱ्या गव्यांना ग्रामस्थांनी हुसकावून लावल्याने गव्यांनी आपला मोर्चा गणेश वाडीकडे वळवला आहे. तरी वनविभागाने तातडीने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पेरण्या करायच्या कशा?

जंगली श्र्वापदांचा वावर जास्त असल्याने पिके घेतली तर त्यातून किती उत्पन्न मिळेल ते सांगता येत नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके घ्यायची की नाही या विवंचनेत शेतकरी आहे.

प्रकाश कोळेकर ग्रामस्थ कोळेकर वाडी

पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न.

सातारा :-वडूज प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा शहर पत्रकार संघ तसेच अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ लालबहादूर शास्त्री विद्यालय सातारा चे उपप्राचार्य डॉक्टर अशोक तवर हे होते. प्राध्यापक मधुसूदन पत्की ज्येष्ठ संपादक व समंत्रक प्रपाठक पत्रकारिता अभ्यासक्रम, प्राध्यापक जयंत लंगडे संपादक लोकसम्राज्य न्यूज समंत्रक प्रपाठक पत्रकारिता अभ्यासक्रम, श्री वैभव सपकाळ कार्यालयीन प्रतिनिधी तसेच श्री प्रकाश महाडिक कार्यालयीन प्रतिनिधी व पत्रकारिता अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी मिलिंदा पवार यांनी केले तर प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी भारत देवकांत यांनी केले व पाहुण्यांचा परिचय प्रशिक्षणार्थी पूजा जगताप यांनी केला तसेच प्रमुख पाहुणे पाटणे सर व कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पत्रकारितेमधील अडचणी व फायदे याबाबतीत माहिती दिली. पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रपाठक पतकी सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थी मनोगत ही झाले व नंतर अध्यक्ष अशोक तवर यांनी अध्यक्षीय भाषण केले व सर्वांसमोर अनुभवांचे शिदोरी खुली केली.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रात्यक्षिक कार्यअंतर्गत नमुना वृत्तपत्र अंजिक्य संवाद चा प्रकाशन समारंभ करण्यात आला तसेच 2023 पत्रकारिता अभ्यासक्रम बॅचचा निरोप समारंभ व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला त्यामध्ये प्रमुख पाहुणे माननीय हरीश पाटणे सर हे या अभासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत तसेच दैनिक पुढारीचे आवृत्तीप्रमुख यांची महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता तसेच माननीय विनोद कुलकर्णी सर हे देखील पत्रकारिता अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी तसेच दैनिक पुण्यनगरीचे आवृत्तीप्रमुख व म सापचे शाहूपुरी शाखा अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठा साहित्य मंडळाचे विश्वस्त यांची मसाप पुण्याच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .

माजी विद्यार्थी ह भ प अमोल जाधव यांनी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच माजी विद्यार्थी आग्नेश शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला शेवटी आभार प्रदर्शन सचिन धुमाळ यांनी केले व कार्यक्रम प्राध्यापक जयंत लंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्टपणे पार पडला.

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

मुरूम: प्रतिनिधि

   डॉ. आंबेडकर मध्यवती जयंती उत्सव मंडळाच्या जिल्ह्याच्या स्तरिय उमेदवाराचे प्रतिभाता निकेतन आणि उच्च माध्यम. विदयाला करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मॅचा प्राचार्या रोड, उपमुख्या उल्पकहास गुरगुडे प्रा. व्याळेसर, प्रा. रामपुरे, प्रा. सूर्यवंशी, श्री. पडसलगेकर सर, प्रा.अंबर सर,पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांचे समवेत मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी होते.

या चिन्ह परिक्षेसाठी २० पालनी उल्लेख नोंदवला. कार्यक्रमाची सोय डॉ. आंबेडकर प्रतिमा – पुजनाने. उपप्राचार्य उल्हास घुरगुरे यांनी मनोगतात डॉ. आंबेडकरांच्या विचारावर प्रकाश टाकत स्पर्धकांनी नवप्रेणा दिली सुत्र संचलन श्री. संतोष कांबळे यांनी तसेच प्रा. नागनाथ बनसोडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय गायकवाड अजिंक्य कांबळे, ज्ञानसागर भालेराव, अमर भतिराव, अजय सूर्यवंशी, विकी बनसोडे इतरांचे सदस्य लाभले

शिवडे ते भवानवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, डांबरीकरण नझाल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा.

कुलदीप मोहिते शिवडे (उंब्रज

शिवडे ते भवनवाडी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संजय भोसले कराड उत्तर तालुकाप्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे )गट यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

गेले पंधरा ते वीस वर्षे शिवडे ते भवनवाडी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला व ते काम गेले एक ते दीड महिना झाले चालू आहे, तरी ते काम संबंधित ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचे व हलक्या प्रतीची करत आहे रस्त्याला वापरलेली खडी व साईट पट्टी भरण्यासाठी वापरण्यात आलेला मुरूम हा माती मिश्रित आहे तसेच रस्त्याचे पिचिंग व्यवस्थित केलेले नाही नियमित पाणी मारले जात नाही त्यामुळे तो रस्ता आत्ताच उकरून परत करावा लागत आहे तसेच साईट पट्ट्या ही ढासळत आहेत. त्याचबरोबर मोरी( साकव) पूल चे काम ही ठिसूळ पद्धतीचे आहे त्याबाबत अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार करूनही अधिकारी व ठेकेदार लक्ष देत नाहीत कामावरील साईट इन्चार्ज उडवा उडवी चे उत्तरे देत असतात तरी ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी ठेकेदार व प्रशासनाचे राहील असा इशारा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे संजय भोसले, ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे .याप्रसंगी उपस्थित भवानवाडी गावचे संतोष पवार, शंकरराव गाडगे, लक्ष्मण गोंजारे, कोंडीबा गुजले ,सौरभ शिंदे , दुर्गेश भोसले ,इतर शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

उदयनराजेंना विक्रमी मताने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांचा निर्धार.

सातारा : प्रतिनिधी मिलिंदकुमार लोहार

सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर महायुतीला प्रचंड मोठी ताकद मिळाली आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मनसे कटिबद्ध असल्याचेही राजसाहेब ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी दि. 18 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी उदयनराजे यांच्या समर्थकांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी सातारा जिल्ह्यातील तमाम मनसैनिकांना रॅलीत सहभागी होण्यास सांगितले होते. त्यानुसार दि. 18 रोजी जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून मनसैनिकांचे जथ्थे सातार्‍यात दाखल झाले. यावेळी त्यांनी हजारोंच्या संख्येने सातारा शहरातून दुचाकी रॅली काढून उदयनराजेंना पाठींबा दर्शविला. या दुचाकी रॅलीचे सातारकरांनी कौतुक केले. यानंतर सकाळी मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी उदयनराजेंची भेट घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा असल्याचे सांगितले. त्यांच्या या पाठिंब्याबाबत उदयनराजे यांनी युवराज पवार यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी बोलताना युवराज पवार म्हणाले, शिवछत्रपतींचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांना तमाम मनसैनिकांनी पाठिंबा दर्शवला असून उदयनराजेंना राज्यातच नव्हे तर देशात विक्रमी मताधिक्क्याने निवडून देवू. यासाठी सर्वतोपरी माझ्यासह जिल्ह्यातील मनसैनिक प्रयत्न करतील. उदयनराजेंनी सातार्‍यासाठी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. सातारा जिल्ह्यातील विकासकामांसाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून ती कामे पूर्णत्वास नेली आहेत. त्यामुळे अबालवृद्धांसह तरुणाईचा त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. उदयनराजेंच्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले मनसैनिक फक्त आणि फक्त उदयनराजेंना विक्रमी मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या रॅलीला झालेली गर्दी पाहून उदयनराजे यांचा विजय निश्‍चितच असल्याचेही त्यांनी सांगितले.

Satara, म्हसळा नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

म्हसळा : सुशील यादव

१४ एप्रिल रोजी संपुर्ण देशभरात साजरी करण्यात येत असलेली महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाचा संयुक्त सोहळा म्हसळा येथील नगर पंचायतीचे कंत्राटी कर्मचारी दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करतात. सालाबाद प्रमाणे या वर्षी म्हसळा पंचायत समिती कार्यालय ते म्हसळा तालुका शहरात राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्रांची वाजतगाजत फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत खास करून म्हसळा नगर पंचायत कंत्राटी सफाई कामगार यांचा सहभाग व मोलाचे सहकार्य लाभले होते.

सातारा, ‘मंथन’ परीक्षेत राघव यादव, अरोही कदम राज्यात पाचवा.

चाफळ : वार्ताहर कुलदीप मोहिते

‘मंन’ राज्य एकूण सामान्य ज्ञानार्थ ‘ओंकार क्लासेस’ राघव यादव या १५०पैकी १४२ गुण शोधत समस्याच्या वर्गातून खाली पाचवाचा मान पटकावला आहे. तर मानेवाडी मैदानाची आति हि सुधाही पाचवा क्रमांक पटकावला ‘ओंकार क्लासेस’ चे संचालक उमेश सुतार आणि शिक्षक श्रीधर यादव यांनी मार्गदर्शन केले.

‘मंन’ ज्ञान सामान्य लोकांसाठी सुमारे चाफळ केंद्रातून २६३ परिक्षार्थींनी परीक्षा दिली होती. चाफळट तुटून चाफळ फाफळचा राघव यादव याने पाचवा क्रमांक पटकावला. तसंच माथनेवाडी वाडीची आबा कदम हिने सुद्धा पाचवा येका मानलाविला. याशिवाय पडळोशी प्लेचा सत्यजीत गायकवाड, चाफळ मुलांचा खेळ देवराज वेल्हाळ हे विद्यार्थी विभाग गुणवत्ता यादीत आले आहेत.

सर्व खेळाडू व श्याचे अभिनंदन चाफळ बिटचे मूळ केंद्रप्रमुख अर्जुन पाटील, मंथनचे केंद्रप्रमुख उमेश सुतार, प्रर्य विजयकुमार कालगे, कराड, पाटणचे समन्वयक महेश आवटे तसेच सर्व शालेय मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.

Satara, साताऱ्यात बालरंगभूमी शाखेला मंजुरी

कोडोली भारतीय मराठी नाट्यगृहाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नाट्याची घटक शाखा अधिकाराच्या सत्या सात बालाराथीच्या प्रश्नपत्रिका सातारकर रंगकर्मींकडे सुपूर्त केले. तसेच बालरंग परिषद परिषद सातारा आठला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सहभागी होताना.
नाट्य सभागृहाने १०० व्या नाट्यसंमेलनाच्या अंतर्गत आयोजित नाट्यजगरात सातारकर रंगकर्मी तसेच पारंपरिकोपाल अर्थात सातारचे बालरंगकर्मींनी उस्फुर्त सादर केले होते. आणि त्याच आधारावर सातुलत बालरंग सरळ सरळ सरळ असा आग्रह धरला होता. आनंद व बाळकृष्ण विकास याने सातारा नाट्य जगतच्या राजकारणाची धुरा उचलली होती, त्यांच्याकडेही निधी जमा करण्यात आला. बालरंग विकास विकास तर निसर्ग रंग बलवान होईल आणि बलरंग अधिकार तत्वाची मांडणी सातला सुरू करणे आवश्यक होते. बाळकृष्ण दल, मिल निलेश माने, सुर्वे, रसिका केसकर, चैतन्य पाटेकर, नील केळकर, कुमार मोने, स्नेहाडवई, आनंद कदम या रंगकर्मींनी फक्त दोन दिवस धकात पन्नास सभासद स्थापन केले आणि अर्थातच यासाठी सभासद घडवले रंगकर्मींनी, विश्वास ठेवल्यांवर आधारित हीचच महत्वाचा खूपच हे महत्त्व अगदीच कमी पटलं. सातारा शाखा कार्यकारिणी ठरवली जाऊ शकते आणि एक उपयुक्त उपक्रमही समोर जाईल हा विश्वास सातार रंगकर्मींनी प्रशांत दामले यांच्याकडे व्यक्त केला. नीलम शिर्के-सावंत, राजीव तुलालवर, दीपा क्षीरसागर, सतीश लोटके, रेगे, दीपाली शेळके, आशिफ शेख या बालरंग रेखादच्या तळाच्या मुख्य जमेच्या सभासदांनी सातारा तुकाला आखले. अवतार तुषार भद्रे, प्रमोद कोपर्डे, रवींद्र डांगे, नितीन दीक्षित, सचिन मोटे, विजय निकम, राजेश मोरे, राजीवुल्ये, संदीप जंगम, प्रसाद नारकर, धैर्यशील उत्तेकर, अमित देशमुख, नितीन देशमाने, रवी इनामदार, सुजित जाधव, सुजित शेख, जितेंद्र खाडिल आदि मान्यवराणी सातारा पक्षाला घडला.