Satara News I म्हसळा तालुका युवा सेनेने म्हसळा अंगणवाडीत महापुरुषांच्या फोटो प्रतिमा दिल्या भेट

 

 

म्हसळा – सुशील यादव

 

अंगणवाडीतील बालकांना बालपणीच राष्ट्र पुरुषांचा आदर्श व इतिहास उमगावा ह्या स्तुत्य हेतुने म्हसळा तालुका उद्धव ठाकरे गटाचे युवासेनेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून शहरातील अंगणवाडीमध्ये महापुरुषांच्या फोटो प्रतिमा भेट केल्या.

आताच्या भौगोलिक परिस्थितीत बदल पाहाता मुलांच्या मनावर देशभक्ती बिबवावी म्हणुन त्यांना देण्यात येणाऱ्या अध्यापनात राष्ट्रीय महापुरुषांचे महत्व समजले उमजले पाहिजे यासाठी युवासेनेने पुढाकार घेत अंगणवाडी सेविका,मतदनिस आणि पालकांचे उपस्थितीत शिवसेना तालुका संघटक बाळा म्हात्रे,जेष्ठ शिवसैनिक विलास खेडेकर,युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे,उपशहर अधिकारी स्वानंद बोरकर,शाखाप्रमुख,अंकुश नटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज,लोकमान्य टिळक,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,भगत सिंग,हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या राष्ट्र पुरुषांच्या फोटो प्रतिमा भेट दिल्या.या वेळी अंगणवाडी सेविका मयुरी दर्गे,मदतनीस श्रीमती वेदक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *