Vaduj Satara I वडूजकराना कुणी घंटागाडी देतंय का ? घंटागाडी ?

प्रतिनिधी:-मिलिंदा पवार, वडूज (सातारा)

गेले पाच दिवस झाले घंटागाडी वडूज मधून फिरली नाही. स्वच्छ वडूज सुंदर वडूज असे म्हणत फिरणारी ही घंटागाडी एकाएकी काय झाले असा विचार करत असतानाच पाच दिवस उलटूनही घंटा गाडी आली नसल्याने नागरिकातून संत्पत प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.

त्यामुळे काही प्रभागातील नगरसेवकांनी वैयक्तिक पातळीवर गाडी पाठवू असे सांगितले तरी नागरिक समाधानी नसून नगर पंचायत काय करतेय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच गाडीत तांत्रिक बिघाड आहे असेही कारणे देत आहेत तर नागरिक फोन करत आहेत तर सुपरवाईजर फोन बंद ठेवून बसले आहेत . असेही नागरिक सांगत आहेत.

तसेच हे आताचे नाही तर खूप दिवसांपासून हेच सूरू आहे अशी संत्पत प्रतिक्रीय नागरिकांनी दिली आहे . तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात सुमारे चाळीस हजार लोकवस्ती असून, सतरा प्रभागात विखुरलेली आहे.

कचरा निर्मूलन आणि जागेचा प्रश्न लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे. शहरात सध्या फवारणी सुरू असून, समन्वय साधून घंटागाडी तातडीने सुरू करण्यात येतील, असे आश्वासन कपिल जगताप मुख्याधिकारी वडूज यांनी दिले आहे

नगरपंचायत स्थापन करून कित्येक वर्षे लोटली तरी समस्यांचे केंद्रबिंदू ठरलेल्या कचऱ्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात पूर्णतः अपयश आले आहे. ग्रामपंचायत कारकिर्दीपासून शहरातील पंतनगर परिसरातील स्वमालकीच्या जागेतील डंपिंग ग्राऊंड रातोरात भाडेतत्त्वावरील जागेत हलविले.

त्याठिकाणी हिंगणे गावातील लोकांनी विरोध करून प्रशासनाबरोबर कायद्याची लढाई सुरू ठेवून तेथीलही डंपिंग ग्राऊंड हलविण्यात कायदेशीर यश मिळविले. यावर विद्यमान नगराध्यक्षांनी समन्वयाने तात्पुरता तोडगा काढत स्वतःच्याच जमिनीवर हे डंपिंग ग्राऊंड सुरू केले. मात्र सद्यस्थितीत येथे कचरा टाकण्यासाठी मज्जाव केला जातोय अशा वडूज शहरात चर्चा सुरू आहेत .

तर नगरपंचायत प्रशासनाकडून वडूजकर मात्र या सारख्या कचऱ्याच्या समस्येवर हैराण झाले आहेत. साचलेला कचरा बंद अवस्थेतील पथदिव्यांचा आधार घेत इतरत्र रस्त्याकडेला टाकत आहेत. नाहीतर ज्यांना बाहेर पडणे शक्य नाही त्यांनी साठवून ठेवला आहे., त्यामुळे रविवार पासून घंटागाडी पूर्ण वडूज मध्ये येत नसून शुक्रवारी पर्यंत म्हणजे पाच दिवस झाले घंटा गाडी आली नाही त्यामुळे ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत .

तसेच पावसामुळे चिखल झाला आहे. आणि त्यामूळे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न ग्रामस्था पुढे उभारला आहे
दुर्गंधीयुक्त कचरा आणि वाढते डासांचे तसेच स्वच्छ पाणी या प्रश्नांना सामोरे जात असतानांच आता कचऱ्याचा प्रश्न ही वडूजकरांना सतावत आहे. तेव्हा नगरपंचायत प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करून वडूजकरांचे आरोग्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी जनसामान्यांतून मागणी करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *