Sunil Tatkare I देशात काँग्रेस पक्षाला यश मिळाले, कारण राष्ट्रीय नेत्यांची भक्कम एकी – सुनिल तटकरे यांची कबुली

कोकणात 15- 0, रायगडात 7- 0, रायगड लोकसभा मतदार संघात 6- 0 हे विधानसभा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून जोमाने कामाला लागणार- सुनिल तटकरे यांनी मांडले विधानसभेचे मिशन

रायगड रत्नागिरीतील जनतेचा आजन्म ऋणी राहीन- लोकसभा निवडणूक विजया नंतर सुनिल तटकरे यांनी मानले जनतेचे आभार

पाली/बेणसे दि. (धम्मशील सावंत)

रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने मला कोकणाचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी पुनछ संधी दिली आहे. रायगड रत्नागिरी तील जनतेचा मी आजन्म ऋणी राहीन अशी प्रतिक्रिया लोकसभा विजया नंतर सुनिल तटकरे यांनी दिली. व मायबाप जनतेचे आभार मानले.

यावेळी बोलताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, माझ्या विजयात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, भाजप , शिवसेना आणि अन्य मित्र पक्षाची मेहनत महत्वपूर्ण ठरली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर मी लोकसभा निवडणूक लढवली त्यास अभूतपूर्व यश आल्याचे समाधान खासदार सुनिल तटकरे यांनी विजयानंतर केले.

कोकणात महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. नारायण राणे,सुनिल तटकरे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हसके आदीं महायुती उमेदवारांचे प्राबल्य दिसून येतंय. भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना एकत्रित असल्यानंतर कोकणचा भक्कमपणा अधिक दिसून येतो. माझ्यासमोर केवळ खासदार हे उद्दिष्ट नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत अव्वल यश मिळविण्यासाठी कामाला लागणार आहे.

कोकणात 15- 0, रायगडात 7- 0, रायगड लोकसभा मतदार संघात 6- 0 हे उद्दिष्ट ठेवून कामाला लागणार आहे. असे विधानसभा मिशन तटकरे यांनी जाहीर केले. देशातील निवडणुकीवर भाष्य करताना सुनिल तटकरे म्हणाले की नरेंद्र मोदी विरुद्ध देशातील सर्वच राष्ट्रीय नेते अशी निवडणूक लढवली गेली, त्यामुळे देशात काँग्रेस पक्षाला यश मिळाले,अशी कबुली सुनिल तटकरे यांनी दिली, मात्र नरेंद्र मोदी यांना जनतेने पुन्हा सेवा करण्याची संधी दिली. देशाला दिलेले दूरगामी विचार , भविष्याचा दृष्टीकोन, देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया याला मोदींच्या रूपाने शक्ती मिळते. असे तटकरे म्हणाले.

राज्यात महायुती आणि अजित पवार गटाला फारसे यश मिळाले नाही यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की आम्ही शेवटपर्यंत महायुती म्हणून कार्यकर्त्यांची जशी भक्कम फळी उभी करणे अपेक्षित होते. तशी फळी आम्हाला उभी करता आली नाही, याउलट महाविकास आघाडीने सुरवातीपासून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली, येत्या काळात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महायुती भक्कम करू असे तटकरे म्हणाले.

सुनिल तटकरे यांनी जनतेचे आभार मानताना आमदार रवीशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, धैर्यशील पाटील, आमदार योगेश कदम आदींचे तटकरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *