उंब्रज: प्रतिनिधी श्रीकांत जाधव
दि. २२/0६/२०२४ रोजी सायंकाळी १६.00 वा.चे सुमारास मौजे हरपळवाडी ता.कराड गावचे हद्दीत एका घराचे आडोशास इसम नामे १) आबासो बाजीराव देशमुख वय ६० वर्ष २) आनंदा गुंगा गायकवाड वय ५० वर्ष ३) दिनकर किसन काळभोर वय ६० वर्ष ४) अमोल बळीराम गायकवाड वय ३२वर्ष ५) बाळासाहेब बजरंग पाटील वय ६२ वर्ष ६) सोमनाथ भगवान काळे वय 30 वर्ष अ.नं.१ते ५ रा.हरपळवाडी ता.कराड अ.न.६रा.अतित ता.सातारा यांनी तीन पानी पत्याच्या डाव स्वताचे फायदयाकरीता बेकायदा बिगरपरवाना खेळताना जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम असा एकुण ९०६०/- किमंतीसह मिळुन आले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार १४५४ पवार हे करीत आहेत .
सदरची कारवाई सपोनि/रविंद्र भोरे यांचे मार्गर्शनाखाली पो .हवा. १४५४ पवार, पोशि श्रीधर माने, मयूर थोरात, निलेश पवार, प्रशांत पवार व प्रफुल्ल पोतेकर यांनी केली.