अभियांत्रिकीचा दीपस्तंभ ठरलेले डॉ. अनिलकुमार गायकवाड : पुण्यात भव्य सोहळ्यात जीवनप्रवासावरील ग्रंथाचे प्रकाशन I Anilkumar Gaikwad I MSRDC I

(लेवांशी ग्रुपचा उपक्रम; प्रा. डॉ. अॅड. सुनील बळीराम गायकवाड लिखित ग्रंथाचे शेरेटोन ग्रँडमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन – भीमालया आयुर्वेद व तकक्षवी परफ्यूमचेही लाँचिंग)

पुणे (विशेष प्रतिनिधी) – अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राज्याच्या पायाभूत सुविधा विकासात मोलाचे योगदान देणारे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या जीवनप्रवासावर आधारित “अभियांत्रिकीचा दीपस्तंभ : डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड” या प्रेरणादायी ग्रंथाचे भव्य प्रकाशन पुण्यातील शेरेटोन ग्रँड हॉटेलच्या शानदार सभागृहात उत्साहात पार पडले.

 

लेवांशी ग्रुपच्या वतीने आयोजित या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. डॉ. गायकवाड यांच्या जीवनातील संघर्ष, कर्तृत्व आणि विकासदृष्टी समाजासमोर मांडणारा हा ग्रंथ त्यांचे लहान बंधू, संसदरत्न पुरस्काराने सन्मानित माजी खासदार प्रा. डॉ. अॅड. सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहिला आहे.

 

या कार्यक्रमात इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड, माजी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, कुलगुरू डॉ. एल. आर. यादव, पुणे आयकर आयुक्त अजय केसरी, डी. वाय. एस. पी. फंड, सिने अभिनेते राणा जी, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सृष्टी डांगे, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई, विशाखा सुनील गायकवाड तसेच लेखक प्रा. डॉ. अॅड. सुनील बळीराम गायकवाड यांच्या हस्ते ग्रंथाचे अनावरण करण्यात आले.

Anilkumar Gaikwad Msrdc
Anilkumar Gaikwad Msrdc

कार्यक्रमाच्या प्रारंभी लेवांशी ग्रुपचे प्रमुख ऑथर कुंतल अरोरा यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास समाजातील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. अशा व्यक्तिमत्त्वावर आधारित ग्रंथ समाजापर्यंत पोहोचवणे ही लेवांशी ग्रुपसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

ग्रंथाचे अनावरण होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. उपस्थित मान्यवरांनी या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करत डॉ. गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला.

 

यावेळी बोलताना इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव सांगताना युवकांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “कुठलेही काम अशक्य नसते. सातत्य, प्रामाणिक मेहनत आणि ध्येयाप्रती निष्ठा असेल तर कोणतीही व्यक्ती मोठे यश मिळवू शकते.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

 

माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी आपल्या भाषणात डॉ. गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी अभियांत्रिकी आणि प्रशासन क्षेत्रात केलेले कार्य अनेक तरुण अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहे. कुलगुरू डॉ. एल. आर. यादव यांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि प्रशासन यांच्या संगमातून देशाच्या विकासाला गती मिळत असल्याचे नमूद केले.

 

कार्यक्रमात उपस्थित इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

या सोहळ्यात आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे “भीमालया आयुर्वेद” आणि “तकक्षवी परफ्यूम” या नव्या उपक्रमांचे भव्य लाँचिंग. मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही ब्रँड्सचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

 

लेवांशी ग्रुपने या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सिमरन कुंतल अरोरा यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पाहुणे आणि सहभागींचे आभार मानले.

 

डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित हा ग्रंथ समाजात सकारात्मक विचार आणि ध्येयवादी वृत्ती निर्माण करेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *