जुने सहकारी राजकीय युद्धात सेनापती बनून सामील, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले 

जुने सहकारी राजकीय युद्धात सेनापती बनून सामील, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले 

 

मुरुड पाठोपाठ रोह्यात शेकापला सुरुंग, नंदू म्हात्रे, लक्ष्मण महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल 

 

मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी केले पक्षात जोरदार स्वागत

रायगड.(धम्मशील सावंत)…….ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला राजकीय हादरे देण्याचे काम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून होत आहे. नुकतेच मुरुड येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता शेकापचे जुने व ज्येष्ठ नेते नंदू म्हात्रे, लक्ष्मण महाले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी दि.(दि.02) मंगळवार रोजी सुतारवाडी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्ष संघटनेला बळकटी मिळाली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत शेकापला सुरुंग लावून निवडणुकीत आपले पारडे कसे जड होईल याची रणनीती राष्ट्रवादीच्या तटकरे कुटुंबाकडून अचूक आखली जातेय.

अनिकेत तटकरे यांनी पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना म्हणाले की सुनील तटकरे यांची नुकतीच महायुतीचे रायगड लोकसभा उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवारी घोषित झाली आहे. अशातच खासदार तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील अनेक वर्षे त्यांच्या राजकीय वाटचालीत असलेली सर्व मंडळी , जुने सवंगडी नंदू शेठ म्हात्रे, श्री महाले आदी राजकीय युद्धात सेनापती म्हणून सामील झाले आहेत, त्या सर्वांचे अंतकरणापासून स्वागत करीत आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असे अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले आहे. जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे आणि सुनिल तटकरे यांचे वैर अथवा मैत्रत्व हे जगजाहीर आहे. आम्ही अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. मतदारसंघाचा सर्वांगीण शाश्वत विकास हीच भूमिका आमची असणार आहे. टीका टिपनी करण्यापेक्षा रायगड कोकणचा विकास कसा होईल यावर भर दिला जाणार आहे. 2014 च्या मोदी साहेबांच्या पहिल्या लाटेत अनंत गीते 2000 मतांनी निवडून आले आहेत, 2019 च्या मोदी लाटेत तटकरे साहेब 34 हजार मतांनी निवडून आले, आता 2024 ला महायुतीचे उमेदवार म्हणून सुनिल तटकरे उमेदवार असल्याने अनंत गीते यांची पायाखालची वाळू सरकली आहे, अनंत गीते यांना काय बोलावे त्यांना समजत नाही, त्यांची बुद्धी सुस्थितीत ठेवावी, अन्यथा जशास तसे उत्तर आम्ही देऊ असा इशारा अनिकेत तटकरे यांनी दिला. शेकापचे नेते, कार्यकर्ते यांची जोरदार इन्कमिंग सुरू असल्याने राष्ट्रवादीचा गड अधिक भक्कम होत असल्याचे अनिकेत तटकरे यांनी सांगितले. नंदू म्हात्रे म्हणाले की आम्ही शेकाप मध्ये दोन वर्षांपूर्वी प्रवेश केला , मन घुटमळत होते. आम्ही 20 ते 30 वर्ष राष्ट्रवादीत काम केले होते,आम्हाला जनतेत जाऊन काम करण्याची सवय आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांची उमेदवारी घोषित झालीय.त्यामुळे तटकरे साहेबांना या चक्र व्यूहातून बाहेर काढण्यासाठी , विजयी करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मंडळी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे म्हटले. सुनिल तटकरे यांच्या माध्यमातूनच रायगड कोकणात मोठ्या प्रमाणावर विकासगंगा वाहणार असल्याचा विश्वास नंदू म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *