जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.

जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.

अपर्णा लोहार सातारा


जनता सहकारी बँकेचे संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांची भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाली . बँकेचे पॅनल प्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन मा. विनोद कुलकर्णी साहेब यांच्या व बँकेचे चेअरमन मा अमोल मोहिते यांच्या उपस्थिती मध्ये ज्येष्ठ संचालक मा अशोकराव मोने यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ संचालक वसंत लेवे (अण्णा), मा.अविनाश बाचल, मा रवींद्र माने, वजीर नदाफ, अनिल जठार, सीए. सौरभ रायरीकर, अन्वर सय्यद आदी मान्यवरांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मा विनोद कुलकर्णी यांनी एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचे वकिली बरोबरच अनेक पदावर काम करत असताना प्रत्येक पदास न्याय देण्याचे , काम करण्याचा प्रयत्न करत असतात असे म्हणत कौतुक केले.

ज्येष्ठ संचालक अशोक मोने यांनी जनता सहकारी बँकेचे एक संचालक नोटरी भारत सरकार झाले याचा आम्हाला आनंद आहे असे त्यांच्या मनोगतात म्हणाले यावेळी ज्येष्ठ संचालक अण्णा लेवे यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्कारास उत्तर देताना एडवोकेट चंद्रकांत बेबले यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा अनिल जठार यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *