Karad I आनंदराव चव्हाण विद्यालय,मलकापूर येथे नवागतांचे स्वागत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न

 

कुलदीप मोहिते कराड मलकापूर

सविस्तर वृत्त…आनंदराव चव्हाण.विद्यालय, मलकापूर येथे नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सवानिमित्ताने विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आहे. तसेच त्यांना पाठ्यपुस्तक,गणवेश, खाऊ वाटप करण्यात आले असून त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांची झांज,ढोल, ताशांच्या गजरात जल्लोषात मलकापूर परिसरातून रॅली यावेळी काढण्यात आली.

या कार्यक्रमास विद्यालयातील माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात भाऊ यांनीही शिक्षणाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.

Karad
Karad

खाऊ तसेच विविध उपक्रमांचे व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करून खाऊ वाटप केले.या वेळी संस्थेचे संचालक,पालक,मुख्याध्यापिका सौ.ए.एस.कुंभार, उपमुख्याध्यापक ए.बी.थोरात, पर्यवेक्षक बी.जी.बुरुंगले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *