श्रीवर्धन : विजय गिरी
मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन म्हसळा येथील प्रेरणा क्लिनिकल लॅब चे संचालक सुशील यादव यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथील सुप्रसिद्ध रिसॉर्ट हॉटेल लक्ष्मी एम्पायर येथे येत्या शनिवार दि. ०३/०२/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनात तब्बल १०० प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यादव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. तसेच या शिबिरात रायगड जिल्ह्यातील उपस्थित लॅब धारकांना अनेक विषयावर मोलाचे मार्गदर्शन देण्यासाठी गोवा येथील प्रसिध्द डॉ. गौरव खरे, तसेच महाराष्ट्र पॅरा वैद्याकिय परिषदेचे माजी सदस्य कुमार पाटील हे उपस्थित रहाणार आहेत. तसेच वेळेचे नियोजन या विषयावर पेण येथील सुबोध जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.
