Patan I काठीटेक शाळेत पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांच्या हस्ते वृक्षारोपण

 

सातारा :-पाटण

(मिलिंदा पवार )

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठी टेक येथे 15 जून 2024 रोजी शालेय आवारात विविध फळझाडांच्या वृक्ष वृक्षारोपण तहसीलदार श्री अनंत गुरव यांच्या हस्ते करण्यात आले .

शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत देवकांत यांच्या दिनांक 16 जून वाढदिवसाच्या औचित्य साधून आंबा चिकू ,फणस , पेरू ,सिताफळ या फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले . याप्रसंगी माननीय तहसीलदार साहेब यांनी आपल्या मनोगतात वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने एक झाड लावलेच पाहिजे व जगवले पाहिजे असा संदेश दिला .

यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक ग्रामपंचायत पदाधिकारी तलाठी पोलीस पाटील केंद्रातील शिक्षक माजी विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षण प्रेमी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भारत देवकांत यांनी स्वागत श्री प्रदीप फड सर सूत्रसंचालन श्रीमती स्मिता खराडे मॅडम तर आभार श्रीदेवीदास भोये यांनी मानले . सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभागी झाले व कौतूक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *