Niranjan Davkhare I निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ घेतलेली मेहनत वाया जाणार नाही; हिरामण कोकाटे यांचा विश्वास

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिहू विभागातील पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला.(छाया:धम्मशील सावंत,पाली बेणसे)

 

 

कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित- हिरामण कोकाटे

 

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)

कोकण पदवीधर मतदार संघासाठी दि.26 जून रोजी मतदान पार पडले. एकूण 13 उमेदवार या निवडणुकीत निवडणूक रिंगणात उभे होते. कोकणात होत असलेल्या या निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासारखा जागरूक, सक्रिय, लोकाभिमुख आणि विकासदृष्टी असलेला उमेदवार पदवीधर निवडणुकीच्या लढतीत आहे.त्यामुळे महायुतीचे उमेदवार आणि तरुणांच्या पसंतीचा सर्वश्रुत चेहरा निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास भारतीय जनता पार्टीचे शिक्षक आघाडी चे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष हिरामण कोकाटे यांनी व्यक्त केला.

निरंजन डावखरे यांचे आजवर पदवीधर, सुशिक्षित वर्गासाठी केलेले प्रत्येक काम रायगड जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात पोहचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. एकूणच कोकण मतदारसंघात निरंजन डावखरे यांच्या नावाला सुशिक्षित मतदारराजाकडून पहिली पसंती मिळाली. पदवीधर मतदारांची नोंदणी ते सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार मिळवून देण्याच्या कामी आम्ही विशेष मेहनत घेतली. निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ घेतलेली मेहनत वाया जाणार नाही; हिरामण कोकाटे असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.

 

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिहू विभागातील पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला.(छाया:धम्मशील सावंत,पाली बेणसे)
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिहू विभागातील पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला.(छाया:धम्मशील सावंत,पाली बेणसे)

 

हिरामण कोकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह निरंजन डावखरे यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून निरंजन डावखरे यांच्या कुशल आणि प्रभावी कार्याची माहिती पोहचविण्यात कोकाटे यशस्वी ठरले. त्यामुळे याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान शिहू विभागातून जास्तीत जास्त पदवीधरानी आपला मताधिकार बजावला आहे. सध्या केंद्र आणि राज्यात भाजप प्रणित शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं घटक मित्र पक्ष असे महायुतीचे सरकार असून विकासाला चालना, आणि तरुणांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अग्रेसर राहिले आहे. निरंजन डावखरे निवडून येतील आणि सुशिक्षित वर्गाला अपेक्षित असलेले विषय मार्गी लावतील असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *