केळोली येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक.

पाटण : प्रतिनिधी श्रीकांत जाधव

चाफळ परिसरातील खालची केळोली ता.पाटण येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोरे कुटुंबीयांचा संसार उगड्यावर पडला असून त्यांना मदतीची गरज आहे.याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या.

माहितीनुसार,खालची केळोली येथील विलास नागू मोरे व कुटुंबीय घर बंध करून शेतात गेले होते.सुमारे ११वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या घरातून धुराचे लोट येत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.त्यानंतर युवकांनी घर उगडून घरातील गॅस सिलिंडर टाकीसह सर्व साहित्य बाहेर काढले व आग आटोक्यात आणली.त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.या आगीत मोरे यांच्या घरातील भांडी,कपडे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.घराच्या तुळई आगीत जळल्याने मोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.तरी या घटनेचा तत्काळ पंचनामा करून मोरे कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची गरज आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *