बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार

बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार 
२०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील : शिबु राजन


मुंबई, दि. ११ (शुध्दोदन कठाडे) : राज्यातील बेरोजगार तरूणांना स्वत:चे उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई पिसीआय एमएसएमई (पिसीआय अर्थात, प्रमोशन काऊन्सील ऑफ इंडिया ) मार्फत लोन उपलब्ध करून देणार आणि त्यांनाच उद्योगाचा मालक बनवणार, असा ठाम विश्वास एमएसएमई पिसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा सरकार यांनी आज येथे व्यक्त केला.

एमएसएमई पिसीआय महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांच्या राष्‍ट्रीय मिल मजदूर संघाच्या परेल येथील कार्यशाळेत ते बोलत होते. आज बेरोजगार तरूण नोकरी मागत आहेत, परंतु त्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे त्यांना एमएसएमई प्रमोशन काऊन्सिल ऑफ इंडियामार्फत लोन देऊन नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा उद्योजक बनवणारच,असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, की एमएसएमई (सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग ) महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर १४४ प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन, प्रशिक्षण, आवश्यक कर्ज आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबध्द आहे. काही महत्वाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांना प्रशिक्षण, उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मशिन्स, कच्चा माल पुरवणार, तसेच त्यांच्या उद्योगात तयार झालेला पक्का माल एमएसएमई पिसीआय स्वत: खरेदी करून घेऊन जाणार, म्हणजे उद्योजकांना मार्केटिंग करून आपला तयार माल बाजारात विकण्याची चिंता राहाणार नाही. सदर प्रक्रिया तब्बल ५ वर्षांपर्यंत सातत्याने सुरू राहाणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सिबु राजन यांनी एमएसएमई पिसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष अविनाश मिश्रा तसेच दिलीप दादू यांचे विशेष स्वागत केले.आपल्या प्रास्ताविक भाषणात शिबु राजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजातील सर्वात अधिक दुर्बल घटकांना एमएसएमई प्रमोशन काऊन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देणाऱ्या योजना राबवून त्यांना स्वत:चा उद्योग उभा करून देण्याची सुवर्णसंधी आलेली आहे. देशाचे एमएसएमई पिसीआयचे अध्यक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. त्यांच्या मार्फत आपण बेरोजगार असलेल्या लोकांना उद्योग-व्यवसायाचे मालक बनवू शकतो. यामध्ये महिलांसाठी खूप चांगल्या योजना आहेत. त्याचा अधिकाधिक लाभ महिलांना देण्याचा आपण कसोसीने प्रयत्न करून महाराष्ट्राला नवा लौकिक मिळवून देऊ. त्यामुळे येत्या २०४७ मध्ये भारत जगातील ५ ट्रिलीयन डॉलर निर्माण करणारी अर्थव्यवस्था बनेल असा ठाम विश्वास व्यक्त करून राजन म्हणाले, की त्यासाठी एमएसएमई पिसीआयच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने मेहनत घ्यावी, गरजवंत पारंंपारिक कारागीर, छोटे उद्योजक, मध्यम उद्योगजक यांच्याकडे ज्ञान आहे, आवश्यक मनुष्यबळ आहे, व्हिजन म्हणजे लक्ष्य आहे, अनुभव आहे, परंतु हे सारे करण्यासाठी आर्थिक पाठबळ नाही. बऱ्याचदा किरकोळ लोनसाठी बऱ्याच बँका त्यांना दारात उभे करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा, व्हिजनचा भंग होतो आणि ते निराश होतात. त्यामुळे अशा हरहुन्नरी, होतकरू नव उद्योजकांना आर्थिक पाठबळच नव्हे, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात, त्यांचे ब्रँडींग करण्यात, एमएसएमई प्रमोशन काऊन्सील ऑफ इंडिया सशक्तपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे, आणि अशा उद्योजकांना आर्थिक, व्यवहारीक प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम उद्योजक बनवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, यात माझी महाराष्ट्राची टीम कुठेही कमी पडणार नाही, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे येत्या २०४७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरची महासत्ता असेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करून शिबु राजन यांनी एमएसएमईच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील गरजवंत, होतकरू, व्हिजन असलेल्या नव उद्योजक, पारंपारिक उद्योजक, महिला तसेच तरूणांपर्यंत एमएसएमई प्रमोशन काऊन्सील ऑफ इंडियाला पोहचवावे, असे कळकळीचे आवाहन करून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत एमएसएमई पिसीआयची भुमिका, कार्यशैली, विविध योजना तसेच प्रशासकीय माहिती देण्यात आली. यावेळी एमएसएमई पिसीआयचे महाराष्ट्र राज्यातील विभागीय उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष तसेच तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेत महिलांची उपस्थिति उल्लेखनीय असल्यामुळे एमएसएमई पिसीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *