मोबाईल टॉवर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडू, शांतीनगर ग्रामस्थांचा रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदनातून इशारा
शांतीनगर ला धोकादायक मोबाईल टॉवर चा विळखा, अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक,
पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत)
नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवेनाका आयटीआय समोर भर मानवी वस्तीत टॉवर ने विळखा घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेकप्रकारचे गंभीर आजार, व्याधींना सामोरे जावे लागत आहे.या ठिकाणी दोन मोबाईल टॉवर मुळे येथील स्थानिक रहिवाशी जनतेच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना याच ठिकाणी राकेश जैन यांच्या इमारतीवर तिसरा टॉवर उभा राहत असल्याने स्थानिक रहिवाशात संतापाची लाट उसळली आहे. मानवी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यास प्रचंड हानिकारक असलेले टॉवर हटवावेत अशी मागणी येथील स्थानिक प्रभाकर तांडेल, प्रिया तांडेल, मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, विनायक तांडेल, रिशी गुप्ता, शुभम गुप्ता,निशांत पिंगळे,दीपक मेस्त्री, रेणू गुप्ता, पल्लवी खरपुडे, आदींसह स्थानिक रहिवाशांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय. विना परवाना अनधिकृत पणे सुरु असलेले सदरचे बेकायदेशीर टॉवर जलततेने हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शांतीनगर येथील स्थानिकांनी दिलाय.