“नीट (युजी ) परीक्षेत म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत ” –

“नीट (युजी ) परीक्षेत म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत ” –

हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार

 

म्हसळा : सुशील यादव

 

नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान पटकवीला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असणाऱ्या दिक्षा बोरकर हिने दहावी आणि बारावी परीक्षेतही प्रथम येण्याचा मान मिळविला. मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युजी सारखी अवघड परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत आल्यास मनासारख्या महाविद्यालयात मेडिकल साठी प्रवेश मिळणं सोपं जात. दिक्षा हिने वर्षाभरातील सर्व सण, उत्सव आणि कुटुंबातील घरगुती कार्यक्रम यांच्याकडे पाठ करून केवळ आपले ध्येय उद्देश याकडे लक्ष केंद्रित केले होते. म्हसळ्यासारख्या ग्रामिण भागात कोणत्याही प्रकारच्या नीट अथवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षाच्या क्लासेसची सोय नसतानाही आई -वडील आणि भाऊ यांचे मार्गदर्शन घेऊन फार मोठे यश संपादन केल्या बद्दल तीचे संपूर्ण जिल्ह्यातून विशेष कौतुक होत असून तिच्यावर सर्वथरातून तीचे अभिनंदन होत आहे. याचे औचित्य साधून म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळातर्फे दिक्षा हिचा गुच्छ आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हिंदू ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुशील यादव,नगराध्यक्ष संजय कर्णिक, समीर बनकर, गौरव पोतदार, प्रदिप कदम, महेंद्र ढवळे, भालचंद्र करडे, सुनिल अंजर्लेकर, स्वेता मंगेश बोरकर, नीता नितीन बोरकर,नीता ढवळे, प्रकाश करडे, राजेंद्र बोरकर, तोंडसुरे सरपंच सुरेश महाडिक,मंगेश बोरकर, योगेश करडे, यतीन करडे, प्रतिक गोविलकर आदि मान्यवर उपस्थित होते.नगराध्यक्ष संजय कर्णिक, समीर बनकर, सुशील यादव यांनी दिक्षा हिस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना दिक्षा हिने सांगितले कि माणसाने सर्वप्रथम आपलें ध्येय्य निश्चित करणे अत्यावश्यक असून तसे केल्यास यश निश्चित पणे मिळते. परीशेच्या आठवड्यात मी अचानक आजारी पडले परंतू खचून न जाता माझ्या ध्येय्य पूर्ती साठी मी उभारी घेतली, यासाठी मला माझे आई, वडील आणि माझा भाऊ यांनी धीर दिला, त्यामुळेच आजचे हे यश मी पाहू शकले.

 

युजी परीक्षेत उणवत्ता यादीत यश संपादन केल्यामुळे म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळातर्फे दिक्षा नितीन बोरकर हिचे अभिनंदन करताना हिंदू ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *