हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार
म्हसळा : सुशील यादव
नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान पटकवीला.
लहानपणापासून शिक्षणाची आवड असणाऱ्या दिक्षा बोरकर हिने दहावी आणि बारावी परीक्षेतही प्रथम येण्याचा मान मिळविला. मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युजी सारखी अवघड परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत आल्यास मनासारख्या महाविद्यालयात मेडिकल साठी प्रवेश मिळणं सोपं जात.

दिक्षा हिने वर्षाभरातील सर्व सण, उत्सव आणि कुटुंबातील घरगुती कार्यक्रम यांच्याकडे पाठ करून केवळ आपले ध्येय उद्देश याकडे लक्ष केंद्रित केले होते. म्हसळ्यासारख्या ग्रामिण भागात कोणत्याही प्रकारच्या नीट अथवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षाच्या क्लासेसची सोय नसतानाही आई -वडील आणि भाऊ यांचे मार्गदर्शन घेऊन फार मोठे यश संपादन केल्या बद्दल तीचे संपूर्ण जिल्ह्यातून विशेष कौतुक होत असून तिच्यावर सर्वथरातून तीचे अभिनंदन होत आहे.

