Raigad News I म्हसळयाचे प्रसिद्ध सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांचे दुःखद निधन

 

म्हसळा – सुशील यादव

 

रायगडाचे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस म्हसळा उपशहराध्यक्ष चंद्रकांत कापरे यांचे दिनांक १४ जुन २०२४ रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान हृदय विकाराचे तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मनमिळावू आणि हसतमुख व्यक्तीमत्व असलेले प्रसिद्ध सिध्दी हॉटेलचे मालक

चंद्रकांत कापरे यांनी म्हसळा येथे हॉटेल व्यवसायात गरुड झेप घेत व्यवसाय करतानाच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नाव लौकिक प्राप्त केले होते.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातुन पत्नी जयश्री चंद्रकांत कापरे यांना नगर पंचायतीमध्ये दोन वेळा निवडून आणत म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ते विद्यमान नगरसेविका असा बहुमान मिळवला आहे.

निधनासमयी चंद्रकांत कापरे यांचे वय ५२ वर्षे होते.त्यांचे पश्चात आई,पत्नी,भाऊ,मुलगा,मुलगी आणि आप्तेष्ट परिवार आहेमयत चंद्रकांत कापरे हे मुळचे उस्मानाबाद येथील बार्शी तालुक्यातील रहिवाशी आसुन ते ३० वर्षा पूर्वी म्हसळा शहरात व्यवसाय करण्याचे उद्देशाने आले होते.त्यांच्या मृत्युची बातमी अचानक समजताच म्हसळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.सर्वच क्षेत्रातील नागरिक व मान्यवर मंडळीने त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *