मावळमध्ये बारणे, वाघेरेंना माधवी जोशीचे तगडे आव्हान. लोकसभा निवडणूक विकासाच्या कामावर लढवणार

रायगड(धम्मशील सावंत)

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यात इंडिया आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाज सेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. जनहित आणि विकासाची प्रचंड कास असलेल्या माधवी  जोशी यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांत प्रचंड जोश संचारला आहे.

माधवी  जोशी यांनी युगपुरुष छ. शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचारास दमदार प्रारंभ केलाय. लोकसभा निवडणूक जनहितार्थ आणि विकासाच्या मुद्द्यावर लढविणार असल्याचे माधवी ताई यांनी सांगितले. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी व्यापक स्वरूपाची जनजागृती आणि लढा उभारणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्द लोकाभिमुख जन कल्याणकारी योजना तळागाळात पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असून मतदारसंघात शाश्वत आणि सर्वांगीण असा जनतेला अपेक्षित विकास करणार असल्याचे माधवी ताईंनी सांगितले.सध्या सर्वत्रच बेरोजगारी ची गंभीर समस्या असून रोजगार नर्मिाणासाठी नवे प्रकल्प आणून रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी स्थानिक पातळीवर नर्मिाण करण्याचा मनोदय माधवी ताई जोशी यांनी व्यक्त केला. तसेच जनतेला भेडसावणारे प्रश्न, पायाभूत नागरी सेवा सुविधा नर्मिाण करण्यावर भर देणार असून शक्षिण, आरोग्य, रस्ते,पर्यावरण, कृषी, पर्यटनावर आधारित विकास, गड कल्लिे लेण्यांचे संवर्धन, आदिवासी वाड्या पाड्यांचा विकास, दरड ग्रस्त, पूरग्रस्त गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा मानस ही यावेळी त्यांनी व्यक्त केला. या देशात इतिहास रचणाऱ्या वीर पुरुषांना जन्म देणाऱ्या माता जिजाऊ , माता सावत्रिी , माता रमाई यांची मी लेक आहे, त्यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर वश्विास ठेवून मला जी संधी दिली त्या संधीचे मी सोने करणार. मतदारसंघात मला जागोजागी जनतेचे उदंड प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ते पाहून माझा विजय नश्चिति होणार असल्याची मला खात्री आहे. असे माधवी ताई नरेश जोशी यांनी सांगितले.माधवी ताई जोशी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यिा मागची भूमिका आणि विकासाचे व्हिजन स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की लोकसभा मतदारसंघात प्रमुख काम सध्याचा ज्वलंत आणि सर्वांना भेडसावणाऱ्या बेरोजगारी च्या मुद्द्यावर प्रभावीपणे काम करणार आहे. कर्जत आदिवासी बहुल तालुका आहे, आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर होत आहे, हे स्थलांतर थांबवण्यिासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार नर्मिाण करण्यासाठी येत्या काळात काम करणार आहे. शक्षिण , आरोग्य, खाजगीकरण रोखणे , पदोन्नती , पोलीस भरती, शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यावर भर देणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात वैद्यकीय कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, नर्मिाण करण्याचा मनोदय ही माधवी ताई जोशी यांनी व्यक्त केला. देश आणि राष्ट्राच्या हितासाठी आदर्श आणि कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी बनण्यासाठी एम पी एस सी , यु पी एस सी साठी मतदारसंघात केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माधवी ताईंनी सांगितले. वाड्या वस्त्यांवर रस्ते ,पाणी, वीज , आरोग्य सेवा सुविधा नाहीत, गरोदर महिलांना आजही झोळीतून दवाखान्यात आणावे लागते, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करताना राजकारणी अपयशी ठरले आहेत, अशावेळी जनतेला अपेक्षित विकास साधण्यावर भर देणार आहे.

आज देश अराजकतेच्या आणि हुकूमशाहीच्या दिशेने जात असल्याचा धोका जाणवत आहे, अशा परस्थितिीत लोकशाही, आणि संविधान वाचवण्यिासाठी श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात या मुद्यावर काम करणार आहोत. ऐतिहासिक पौराणिक वास्तू, गड , कल्लिे , लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असून पेब कल्लिा, कार्ला बुद्ध लेणी , कोंडाणा बुद्ध लेणी, यांचा विकास व पर्यटन वाढीवर भर देणार आहे. केंद्रा सरकारच्या माध्यमातून रोजगार नर्मितिी साठी नविनविन प्रकल्प आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. रसायनी , खोपोली , खालापूर येथील रोजगार देणाऱ्या अनेक कंपन्या स्थलांतर होत आहेत. इतरत्र जात आहेत त्यांना थांबवण्यिासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे माधवी ताई जोशी यांनी सांगितले.कर्जत रेल्वे स्टेशन जंक्शन असून स्टेशनचा वस्तिार आजवर केला नाही, येथे कोणतेही सुशोभीकरण नाही, लांब पल्ल्याच्या गाड्या इथं थांबत नाहीत , सुशोभीकरण वस्तिारीकरण केल्यास पर्यटक , रोजगाराच्या संधी वाढतील त्यामुळे याकामी लक्ष देणार आहे. जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ माथेरान , लोणावळा, सोलन पाडा धबधबा, झेनिथ धबधबा, आशाने कोषाने धबधबा, भुशी डॅम्प, टायगर पॉईंट, पळसदरी येथील पर्यटन क्षेत्राचा विकास आणि पर्यटनावर आधारित रोजगार नर्मिाण करण्यावर भर देऊ. मतदारसंघात पायाभूत नागरी सुविधांची वानवा आहे, त्या प्राधान्याने सोडवण्यिाचा प्रयत्न करणार . शोषित वंचित पीडित घटकांचा विकास साधने, बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, केंद्राच्या लोकाभिमुख जनकल्याणकारी योजना मतदारसंघात लाभार्थी घटकांपर्यंत पोहचवुन त्यांचा खऱ्या अर्थाने आर्थिक सामाजिक विकास घडवून आणण्यावर भर देणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
समाजकल्याण खात्याचा वद्यिार्थ्यांचा बजेट रखडवून ठेवला असल्याने वद्यिार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.

या प्रश्नी काम करणार आहे. जलजीवन मिशन योजनेतून करोडो रुपये आले पण योजना राबवल्यिा गेल्या नाहीत, अजून ही महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती होते, महिलांना घरोघरी मुबलक पाणी देण्यासाठी , त्यांचे हाल थांबवण्यिासाठी काम करणार आहे. एक्सप्रेस हायवेला कॅन्टीग नाही, चालक वाचकांचे हाल होतात, तिथे कॅटिंग असणे गरजेचे आहे. आदिवासी वाड्यापाड्यावर आजही रस्ते नाहीत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून वाड्यापाड्यावर रस्ते पोहचवण्यासाठी काम करू. ईशालवाडी दुर्घटनेत आख गाव दरडीखाली गेले, अनेक नष्पिाप जीवांचा बळी गेला, अशा दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे माधवी ताई जोशी यांनी सांगितले. मावळ लोणावळा ते पनवेल पर्यंत मोठं हॉस्पिटल नाही, अपघातग्रस्त , गंभीर रुग्णाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू होतो, काळाची गरज ओळखून एक मोठं रुग्णालय या मार्गावर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच भीमाशंकर नॅशनल हायवेचे भूमिपूजन होऊन काम रखडले आहे, हा रस्ता जलद पुणे ज्ह्यियाला जोडला जातो, ते काम थांबला आहे त्या कामाला चालना देण्यासाठी काम करणार आहोत. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मतदारसंघात सायबर सेल नर्मिाण करणे यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत. मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात असून जनता मला भरघोस मतांनी निवडून देऊन लोकसभेत प्रतिनिधत्वि करण्याची संधी देईल असा वश्विास शेवटी माधवी ताई जोशी यांनी व्यक्त केला. माधवी ताई जोशी यांना निवडणूक प्रचारादरम्यान विविध समाज घटक, सामाजिक संस्था संघटना यांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांची ताकत वाढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते , अनुयायी रक्त आटवून तन मन धनाने प्रचार करीत असल्याने माधवीताई नरेश जोशी या विजयी होणार असा वश्विास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *