महाशिवरात्री दिवशी साताऱ्याच्या चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’..

महाशिवरात्री दिवशी साताऱ्याच्या चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’..

“300 रुपये देतोयस का? का तुझं पण स्टेटस ठेऊ”? पडलं महागात

उघडा पोस्ट अन वाचा नीट..

लोकशासन न्युज नेटवर्क सातारा

 

साताऱ्यातील अनेकांना स्वतःच्या नशेसाठी पैश्यांची मागणी करणारा नट’सम्राट’ अखेर आज कायद्याच्या अडकीत्यात सापडला.. मदिरेसाठी याने वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते अगदी प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ,कनिष्ठ पत्रकारांबाबत अर्वाच्य भाषेत स्टेटस ठेवणे, शिवराळ भाषेत ग्रुपवर पोस्ट करणे हा धंदाच सुरू केला होता.. त्याचा फेमस डायलॉग “300 रुपये देतोयस का? का तुझं पण स्टेटस ठेऊ”?अशी धमकीवजा खंडणीच मागायचा एककलमी कार्यक्रम सुरू होता. जवळचे मित्र आणि बहुतांशी पत्रकारांनी पण याला जमेल तेवढी आर्थिक मदत या 2 वर्षात केली होती मात्र ती मदत हा मदिरेसाठी उडवायचा आणि मदिरा खळगीत गेली की, मदमस्त होऊन मदत करणाऱ्यांनाच फाट्यावर मारायचा..मग ती मदत खंडाळा सर्किट हाऊस असो वा सातारा..! फोन करून पैसे मागणे,धमकी देणे यात याचा हातखंडा होता. हा गाय’काम’वाड नशेतर्रेबाज असल्याने नको त्याच्या नादाला लागायला म्हणून अनेकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.पण याचा त्रास हा वाढतच गेला.अनेकांनी आपलेच दात अन आपलेच ओठ म्हणत अनेकांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देखील सहन करत दुर्लक्ष केलं.

घोटभर मदिरेसाठी पिसाळलेल्या हत्तीसारखा दिसेल त्याला तुडवत तसा भेटेल त्याला पैसे मागत सुटायचा आणि ज्याने दिले नाही त्याचे स्टेटस ह्याच्या अकाउंट वर चिटकवायचा..
कोणाचा व्हाट्सएपचा ग्रुप असला की नको ते चॅटिंग करून नाहक बदनामी करायचा रोजचाच धंदा..

असो जे पाप-पुण्य केलं आहे त्याचा हिशोब येथेच करायचा आहे. आपण एखाद्याची बदनामी केली तर आपलीही बदनामी होणे अटळ आहे. हे मद्याभोवती वेटोळे घालून बसलेल्या नट’सम्राटा’ला कधी कळलेच नाही आणि स्वतःचे आणि कुटुंबाचे वाटोळे करून घेतलं..

आता ऐन ‘गर्मीत’ जेलची ‘हवा’ खात बसावे लागणार आहे..
सत्कार्यातून कार्यसम्राट होण्यापेक्षा याने मद्यातून नट’सम्राट’ होण्याचा मार्ग अवलंबल्याने आज हातात बेड्या अडकवून आतमध्ये जाण्याची वेळ आली आहे. याला कोण फूस लावत होत हे पोलीस तपासात समोर येईलही,एखाद्याला बदनाम आणि पैसे उकळण्यासाठी याचे साथीदार महिलांना सोबत घेऊन प्रतिष्ठितांविरोधात खोटे अर्ज करून षडयंत्र रचत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.. भविष्यात या नट’साम्राटाची टोळी’ पोलिसांनी शोधून हे रॅकेट उध्वस्त करण्याचे आवाहन पोलिसांवर असणार आहे.

साताऱ्याच्या पत्रकारितेला इतिहास आहे आणि साताऱ्याच्या पत्रकारितेच्या आदर्शचा कित्ता राज्यात गिरवला जातो.म्हणून तर पुण्यातील अधिवेशनात पत्रकारांनी अध्यक्षांना डोक्यावर बसवून मिरवले होते. हे फक्त सातारकर पत्रकार करू शकतात मात्र याच पत्रकारांच्याकडे कोणी तिरक्या नजरेने बघितलं तर
महाशिवरात्री दिवशी साताऱ्याच्या चौथ्या स्तंभाला देखील ‘तिसरा डोळा’ उघडावा लागतो..👁️

प्रशांत जगताप,पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *