मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद

मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा
शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद

( कुलदीप मोहिते कराड)
कराड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनाच्या मान्यतेने येथे मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ७० किलो वजन गटात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव संघाने (shivmudra kaulav sangha)विजेतेपद पटकावले.
३५ किलो वजनगटा पाठोपाठ ७० किलो गटात ही कोल्हापूरने वरचष्मा राखला आहे.
लिबर्टी मजदूर मंडळ(libarty majdur mandal) व रणजितनाना पाटील (ranjeetnana patil) यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
७० किलो वजन गटात महाराष्ट्रातून एकूण २४ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव या संघाने विजेतेपद पटकावले तर बारामती तालुक्यातील महाराणा क्रीडा मंडळ कळंबने उपविजेतेपद पटकावले. टेंभूच्या रामकृष्ण वेताळ फाउंडेशन संघाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट चढाईसाठी शिवमुद्राचा निलेश बर्गे यास बक्षीस देण्यात आले तर उत्कृष्ट पकडसाठी लिबर्टीच्या निषाद पाटील याला सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू खेळाडूचा किताब कळंबचा सिद्धार्थ कांबळे यास देण्यात आला.
बक्षीस वितरण सलीमभाई मुजावर, सचिन पाटील, युवराज पाटील, जितेंद्र जाधव, दादासाहेब पाटील, किशोर जाधव, विनायक पवार, रणजितनाना पाटील, राजेंद्र जाधव, भास्कर पाटील, मुनीर बागवान सावकार, रमेश जाधव, आशपक मुजावर, जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
बुधवारी पुरुष व्यावसायिक गट आणि खुला महिला गटाच्या स्पर्धा सुरू झाल्या. यात राज्यातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असून सामने पाहण्यासाठी गर्दी होत आहे.