Satara, म्हसळा नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

म्हसळा : सुशील यादव

१४ एप्रिल रोजी संपुर्ण देशभरात साजरी करण्यात येत असलेली महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाचा संयुक्त सोहळा म्हसळा येथील नगर पंचायतीचे कंत्राटी कर्मचारी दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करतात. सालाबाद प्रमाणे या वर्षी म्हसळा पंचायत समिती कार्यालय ते म्हसळा तालुका शहरात राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्रांची वाजतगाजत फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत खास करून म्हसळा नगर पंचायत कंत्राटी सफाई कामगार यांचा सहभाग व मोलाचे सहकार्य लाभले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *