Mission Ayodhya
Mission Ayodhya

Mission Ayodhya I ‘मिशन अयोध्या’: राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट !

मुंबई, (मनोरंजन प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिकप्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून होणार आहे.

दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हे ‘मिशन अयोध्या’ च्या चित्रीकरणाचा अनुभव वर्णन करताना म्हणाले, “अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र परिसरात चित्रीकरण करणे हे केवळ माझ्यासाठी नव्हे, तर संपूर्ण युनिटसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरला. विषम तापमानाच्या आव्हानांवर मात करत, त्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना प्रत्येक क्षण प्रेरणादायी होता. मंदिराच्या भव्य वास्तुशिल्पाचा प्रत्येक कोपरा, वातावरणातील अलौकिक शांतता, आणि रामनामाचा गजर आमच्या हृदयाला स्पर्शून गेला.

‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट केवळ एक कथा सांगणारा नाही, तर प्रभू श्रीरामांच्या अनंत भक्तीसाठी समर्पित एक आध्यात्मिक प्रवास आहे. मला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या चरणांशी आत्मीयतेने जोडेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करेल.”

निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले ‘मिशन अयोध्या’ हा केवळ चित्रपट नसून रामभक्तांसाठी एक आध्यात्मिक उत्सव आहे. अयोध्येच्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना तिथल्या सकारात्मक ऊर्जेने आम्हाला प्रेरणा दिली. आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रामभक्तीची ज्योत निरंतर तेवत ठेवून प्रभू श्रीरामांबद्दलची आस्था अधिक दृढ करेल.”

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *