author

Atul Save I झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार –  मंत्री अतुल सावे

मुंबई दि ४- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असून अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना- हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यास मंत्री अतुल […]

Government Scholarship I मुंबई विद्यापीठातील बहुतेक महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेत आहेत संपूर्ण शुल्क 

  कुलगुरू मात्र बघ्याच्या भूमिकेत सामाजिक न्याय विभागालाही पडला विसर, बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक   रायगड – (धम्मशील सावंत)मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे जवळपास सर्वच महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रवेश शुल्क घेत असल्याचे चित्र यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिये वेळी दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबद्दल काही सोयरसुतक राहिलेले नाही, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक […]

Umte Dam I उमटे धरणाच्या ओव्हरफ्लोच्या अतिधोकादायक भिंतीच्या कामाला सुरुवात

उमटे धरण संघर्ष समिती रायगडच्या प्रयत्नांना यश पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)संबंध महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या ओव्हफ्लोच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, पावसाळ्यात ही भिंत तुटून हाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात होती. उमटे धरण संघर्ष समितीच्या अँड राकेश पाटील यांनी तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या,त्या बाबतीतल्या […]

Head Masters I मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसूळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

  प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सेवापुर्ती समारंभ संपन्न…..   पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांढरोली शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसुळे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व खालापूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाला. मुख्याध्यापक सुरेश अडसुळे यांनी शिक्षण क्षेत्रातील 38 वर्ष सचोटीच्या सेवेनंतर ह्या सेवेतून निवृत्त […]

Make up artist I रायगडच्या सुकन्येची उंच भरारी…सोनाली इडेकर

  दिग्गज कलाकारांचा करते मेकओवर, महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी लावणार हातभार   रायगड (धम्मशील सावंत ) जिद्द, मेहनत व चिकाटी या जोरावर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला या छोटयाश्या गावातील तरुणी सोनाली निनाद इडेकर यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून नावलौकिक मिळविले आहे. मेकअप आर्टिस्ट, साडी ड्रेपिस्ट, हेअर स्टायलिस्ट, या कामात त्यांचा हातखंडा आहे. आत्तापर्यत तिने अनेक […]

Dikshabhumi I आम्ही आंदोलक आहोत, गुन्हेगार नाही – डॉ. नितीन राऊत

  दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनातील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत सभागृहात मागणी नागपूर, दि. ०३/०७/२०२४ (प्रवीण बागड़े) दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला विरोध म्हणून झालेल्या आंदोलनात आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहे. आम्ही आंदोलन करणारे आहोत गुन्हेगार नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी आज सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार […]

शिवु बेनसे भागात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

शिहू बेणसे विभागातील जनता विजसमस्येने हैराण, दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा विजवीतरण विरोधात शिहू बेणसे विभागातील जनतेत संतापाची लाट, अन्यथा विजवीतरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेऊ, महिला, तरुण आक्रमक    वीज प्रश्नावर बेणसे सिद्धार्थ नगर येथे महत्वपूर्ण बैठक   पाली/बेणसे दि.(धम्मशिल सावंत) शिहू बेणसे विभागाची विजसमस्या मागील अनेक वर्षांपासून […]

Aantarbharati I केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार

  15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण   आंबाजोगाई- दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा केरळची कन्या सिंधू पुरुषोथमन पणीकर (नवगिरे) यांना दिला जाणार आहे. अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत वास्तव्य करणाऱ्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. श्रीमती सिंधू ह्या केरळच्या कोट्यायम जिल्ह्यातल्या. बी एस्सी नरसिंग करून […]

Dikshabhumi I दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगचे काम तात्काळ थांबवावे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

मुंबई / नागपूर नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली.   धम्मचक्र […]

Ramdas Athawale I मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील ‘सहवासातले आठवले ‘ पुस्तकाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई दि.३० — मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक माझे नेहमी शांत असते मस्तक अशी काव्यमय सुरुवात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली. डॉ बाबासाहेब नसते तर […]