Make up artist I रायगडच्या सुकन्येची उंच भरारी…सोनाली इडेकर

 

दिग्गज कलाकारांचा करते मेकओवर, महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी लावणार हातभार

 

रायगड (धम्मशील सावंत )

जिद्द, मेहनत व चिकाटी या जोरावर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला या छोटयाश्या गावातील तरुणी सोनाली निनाद इडेकर यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून नावलौकिक मिळविले आहे. मेकअप आर्टिस्ट, साडी ड्रेपिस्ट, हेअर स्टायलिस्ट, या कामात त्यांचा हातखंडा आहे.

आत्तापर्यत तिने अनेक दिग्गज कलाकारांचा मेकओवर केला आहे. ही कला इतरही महिलांनी आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी सोनाली या काही दिवसांत सोनाली’ज मेकओवर मास्टर क्लासेस सुरु करणार आहेत. त्याद्वारे अनेक तरुणी व महिलांना रोजगार उपलब्ध होईल.

रायगडची सुकन्या सौ. सोनाली इडेकर दिग्गज कलाकारांचा मेकओवर करताना छायाचित्रात दिसत आहे. (छाया: धम्मशील सावंत,पाली बेणसे)
रायगडची सुकन्या सौ. सोनाली इडेकर दिग्गज कलाकारांचा मेकओवर करताना छायाचित्रात दिसत आहे. (छाया: धम्मशील सावंत,पाली बेणसे)

सोनाली या सध्या ठाणे येथे राहत असून मागील चार वर्षांपासून मेकअप क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या पदवीधर असून मेकअप क्षेत्रातील आधुनिक व आद्ययवत कोर्सेस त्यांनी पूर्ण केले आहेत.सौ. सोनाली निनाद इडेकर यांनी अनेक सिनेकलाकर उदा: राज अनादकट (टप्पू), तनया गुप्ता, तारक मेहता का उलटा चष्मा मधील प्रख्यात कलाकार, तसेच क्रीतीका शर्मा, पूजा गोर, वरून सूद, करण जोशी, करण ठाकूर, अशा अनेक कलाकारांसोबत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.

पुढील काही दिवसात ‘सोनीज मेक ओवर मास्टर क्लासेस चालू करणार असल्याचा मानस सौ .सोनाली यांनी व्यक्त केला. या क्लासेसच्या माध्यमातून युवती व महिलांना चांगले शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी देखील उपलब्द करून दिले जाणार असल्याचे सौ. सोनाली इडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. अधिक माहितीसाठी सोनी मेक ओवर मो.नं. 9819897418 यावर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *