भंडारा, 16 मार्च : भंडारा जिल्हयाच्या तुमसर- बपेरा मार्गावरील रनेरा गावाजवळ माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक तुमसर वरून बालाघाटच्या दिशेने जात होता. अचानक ट्रकचे स्टेरींग लॉक झाले व ट्रक रोडच्या बाजूला उलटला.
सुदैवाने समोरून कुठलीही वाहणे त्या वेळी येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. तर ट्रकच मोठं नुकसान झालं असुन कुठलीही जीवित हानी झाली नाही.