खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

प्रशांत सकुंडे

मेढा ता. जावली येथे मागील वर्षी म्हणजेच मे २०२३ मध्ये मुंबई वरुण मित्राच्या लग्नासाठी आलेल्या एका तरुणास ७ ते ८ संशयितांनी मारहाण केली होती , या प्रकरणातील तरुणास लाकडी दांडके व हाता पायाने ( लाथा बुक्क्यांनी ) मारल्याचे आरोप संशयित आरोपींवर होते , मारहाणीनंतर सदर जखमी इसमाचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यामुळे सदर प्रकरणामध्ये एकूण ८ ते ९ संशयित आरोपींवर मेढा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होऊन पोलिस प्रशासनाने संशयितांना जून महिन्यात अटक केली होती.
सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक ४ नामे अभिषेक सोनावने याच्यावर मयत इसमास मारहाण केल्याचे आरोप दोषारोप पत्रात होते , सदर आरोपीस मे. सत्र न्यायालयाने अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला असून संशयित आरोपीच्या वतीने ॲड. प्रथमेश बनकर , ॲड. मंजित माने, ॲड. इंद्रजित पाटील यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *