वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान

 

वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान

प्रशांत सकुंडे लोकशासन न्युज सातारा

गणेशनगर:येथील फॉरेस्ट कॉलनी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण सातारा. राजपाल गोविंदराव पाटील सर्वेक्षक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या बांबू लागवड योजनेसाठी माननीय मुख्य वन संरक्षक आर. एम. रामानुजन प्रादेशिक कोल्हापूर यांचे हस्ते देण्यात आला.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर व पडीक जमिनीवर बांबू लागवड काम घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पाटील यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले याबद्दल त्यांचे प्रशस्तीपत्र घेऊन अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सूचनेनुसार माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा सामाजिक वनीकरण विभागात एकूण१०००० हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट दिले होते त्यापैकी ९५२.०६ हेक्टर बांबू लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली सदर योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत त्यासाठी त्यांच्या या कामासाठी विलासपूर परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *