Dr. Babasaheb Ambedkar I डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करणार, हजारोंच्या संख्येने सामील व्ह.- युवा जिल्हाध्यक्ष विकी भालेराव

रायगड . (धम्मशील सावंत )

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धर्मामध्ये माणसाला माणूस बनण्याचा अधिकार नाही अशा मनस्मृतीचे दहन दि. २५ डिसेंबर १९२७ साली महाडच्या क्रांती भूमीमध्ये केलं होतं त्याच मनुस्मृतीचे पुन्हा दहन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पुन्हा सोमवार दि.१० जून रोजी सकाळी १२ वाजता महाड येथे क्रांतीभूमीत करण्यात येणार आहे.

ज्या मनुस्मृती मुळे हा संपूर्ण देश जगातील सर्वात मागासलेला देश ओळखला गेला. ज्या मनुस्मृतीने माणसा माणसात भेद निर्माण करून गलिच्छ आणि विकृत अशी जाती व्यवस्था निर्माण केली, वर्ण व्यवस्थेद्वारे या देशातील बहुजन समाजावर जनावराप्रमाणे जगण्याची परिस्थिती आणली.

 ज्या मनुस्मृतीला क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाळण्याच्या लायकीचा ग्रंथ असे म्हटले आणि त्यांचे म्हणणे खरे करून दाखवणारे त्यांचे शिष्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी २५ डिसेंबर १९२७ साली या विकृत पुस्तकाची जाहीर होळी करून या देशातील बहुजन समाजाच्या हजारो वर्षाच्या मानवी गुलामाच्या बेड्या तोडल्या आणि नवीन संविधान निर्माण करून सर्वांना समता स्वातंत्र्य आणि बंधुता निर्माण करून हक्क आणि अधिकार दिले.

मनुस्मृतीला या पुरोगामी राज्याचे प्रतिगामी मुख्यमंत्री आणि त्यांचे शिक्षण मंत्री शालेय शिक्षणात समाविष्ट करू पाहताहेत त्यांचा आणि त्यांच्या विकृत मानसिकतेचा निषेध करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती चे सभापती, पि. ई. सोसायटीचे चेअरमन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १० जून २०२४ रोजी दुपारी १२.०० वा. महाड येथील क्रांतिभूमी येथे सर्व वैचारिक बुद्धिवादी संघटना एकत्र येऊन या मनुस्मृती ची पुन्हा जाहीर होळी करून या मानवद्वेषी सरकारचा जाहीर निषेध करणार आहेत.

या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना तसेच समविचारी संघटनेने मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुन्हा एकदा आंबेडकरांना साथ द्यावी असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष विकी भालेराव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *