Shivswarajya Din I वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

 

कुलदीप मोहिते कराड

कराड (दि. 7 जून प्रतिनिधी): श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे शिवस्वराज्य दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

सकाळी 8.00 वाजता शिवतीर्थ कराड येथून शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिवज्योतीचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन अरुण पाटील (काका) विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

 

कलारंजन सभागृहामध्ये श्रीमती रेखा कसबे, मस्करवाडी व कु. दिव्यांका दुधाडे आणि कु. स्मित पवार यांचा पोवाडा सादरीकरण कार्यक्रम झाला. याप्रसंगी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या प्रा.डॉ. एस. आर. सरोदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व श्री कांबळे सर यांनी आभार मानले.

 

श्रीमती तेजश्री सरकाळे यांनी सूत्रसंचालन केले. सदर शिवस्वराज्य दिनानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *