भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून काढण्यात आली
हवालदार दीपक कदम यांचे वडील भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना ऑपरेशन जम्मू-काश्मीर येथे शहीद झाले त्यानंतर त्यांच्या आई शहीद वीर पत्नी यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करून त्यांना भारत मातेच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्य दलामध्ये भरती केले.व त्यांचा एक मुलगा हवालदार दीपक कदम हा सेवानिवृत्त झाला आहे दुसरा मुलगा आजही भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावत आहे.
