निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यामध्ये तापू लागले आहे. अनेक ठिकाणी महायुतीचे महाआघाडीचे मेळावे सुरू झाले आहेत. कराड तालुक्यातील विजयनगर येथील पार्वती हॉल येथे महायुतीचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कराड पाटण विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई व कराड दक्षिण व उत्तर अतुल भोसले व मनोज घोरपडे रामकृष्ण वेताळ धैर्यशील कदम व दिग्गज नेत्यांनी जोमाने काम करावे गुलाल आपलाच आहे, असा विश्वास आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ताकतीने उभे राहू असा निर्धार व्यक्त केला. अतुल भोसले यांनी सांगितले की कराड दक्षिण मधून लीड देऊ यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले की,आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना व नरेंद्र पाटील यांना मिसळ खाण्याचे निमंत्रण दिले व आपण कोणाला प्रतिस्पर्धी मानत नाही. असं अप्रत्यक्षरीत्या सांगितले यावेळी नरेंद्र पाटील सुद्धा म्हणाले उदयनराजे व माझ्यामध्ये कोणीतरी वाद निर्माण करताय त्यांना काही साध्य होणार नाही.
आम्ही सर्वजण एकजुटीने लढू व विजय होऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी पदाधिकाऱ्यांचा उत्साह होता या मेळाव्यास आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, अतुल भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, सचिन नलावडे, नरेंद्र पाटील आदी घटक पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.