यश राहूलदेव मनवर चे नवोदय विद्यालयासाठी सुयश  

यश राहूलदेव मनवर चे नवोदय विद्यालयासाठी सुयश  

 

मंगरूळपीर = विनोद डेरे 

 

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ वयोवृध्द कार्यकर्ते व त्याकाळचे सदन शेतकरी विठ्ठलराव मनवर रा.जनुना बु॥ यांचे नातू, वंचीत आणी बहुजनांच्या विविध समस्यासाठी अहोरात्र झटणारे राहूलदेव मनवर यांचे चिरंजीव तसेच मराठी वातावरणात अतिशय परीश्रमाने विद्यार्थी घडविणारी अधिकारी पदांपर्यंत अनेक विद्यार्थी पोहचवणारी पंचशिल इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापीका आयु.करुणा राहूलदेव मनवर यांचे द्धितीय चिरंजीव यश राहूलदेव मनवर यांची वर्ग ९ वी साठी जवाहर नवोदय विद्यालय वाशीम च्या रिक्त ४ जागांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेद्वारे निवड झाली आहे. याकरीता नवोदय विद्यालय वाशिम ने जिल्हाभरातील हजारो विद्यार्थ्यांची फेब्रुवारीमध्ये परीक्षेत सहभागी झाले होते . त्यातुन यश राहूलदेव मनवर यश संपादन केले यश मनवरचे शिक्षण नर्सरीपासुन ते ७ वी पर्यतचे पंचशिल इंग्लिश स्कूल मंगरूळपीर येथे पार पडले. त्यामुळे त्याला आईचे मार्गदर्शनही लाभले. यश सद्या यशवंतराव चव्हाण सीबीएसई स्कूल मंगरूळपीर येथे इंग्लिश मेडीअमचे शिक्षण घेत आहे. नवोदय विद्यालय वाशीमच्या परीक्षेचे पेपर सुद्धा इंग्रजी माध्यमातुनच घेण्याच आले होते. यश आपल्या यशाचे श्रेय सर्वप्रथम त्याची आई करुणा मनवर वडील राहूलदेव मनवर, आपल्या शाळेचे प्राचार्य डॉ.संजीव कुमार तसेच सर्व शिक्षक वृंद यांना देतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *