गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे दि.२८/०३/०२४ रोजी तिन्ही गावचे वन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जगताप सर नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांचेकडे सादर करण्यात आले.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी ( वन हक्क मान्य) अधिनियम २००६, हा कायदा लागू होवून १७-१८ वर्षे झाली आहेत.महाराष्ट्रामध्ये त्याची अनेक जिल्ह्यात अंमलबजावणी झाली.विशेषत: विदर्भात मोठ्या प्रमाणात व प्रभावी अंमलबजावणी झाली आहे.
CPC संस्था नागपूर यांच्या प्रयत्नाने मौजा चौडमपल्लीचे कंपार्टमेंट नं. एकूण ९ एकूण क्षेत्र- आराजी-१७६९.०५४ हे.आर वनभुमी, मौजा सिंगनपल्लीचे कंपार्टमेंट नं.एकून ५ एकूण क्षेत्र-११९३.९४ हे.आर वनभुमी व चपराळाचे कंपार्टमेंट नं.एकून ७ एकूण क्षेत्र-१२२८.३६५ हे.आर वनभुमी जागेचा सामुहिक वन हक्क दावा SDM कार्यालय चामोर्शी येथे सादर करण्यात आला.
सदर प्रक्रियेत अजिंक्य ऊके,चिंतामन बालमवार,सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव संस्था नागपूर यांचे तांत्रिक मार्गदर्शन वसंत बारसागडे ग्रामसेवक चौडमपल्ली यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.
सामुहिक वन हक्क दावा सादर करताना साईनाथजी गुरनुले- अध्यक्ष वन हक्क समिती चपराळा,दयानाथजी कोकेरवार-उपसरपंच चपराळा,सखारामजी कन्नाके- अध्यक्ष वन हक्क समिती चौडमपल्ली,मारोतीजी गेडाम – सचिव वन हक्क समिती चौडमपल्ली,मारोतीजी कन्नाके-अध्यक्ष वन हक्क समिती सिंगनपल्ली,विश्वनाथ गावडे सचिव वन हक्क समिती सिंगनपल्ली व पदाधिकारी उपस्थित होते.