Ramdas Athvale I रिपाइं नेते रामदास आठवले तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री

 

सुधागड आरपीआय कार्यकर्त्यांकडून पालीत फटाके व लाडू वाटून जल्लोष साजरा

 

रायगड (धम्मशील सावंत )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच रामदास आठवले यांनी नुकतीच दिल्लीत मंत्रिपदाची शपत घेतली. याचा जल्लोष सुधागड तालुक्यातील पाली व अनेक गावात आरपीआय च्या कार्यकर्त्यांकडून कोकण प्रदेश संघटक रवींद्रनाथ ओव्हाळ, तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे यांच्या उपस्थितीत लाडू भरवून व फटाके फोडून साजरा करण्यात आला.

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनन्याची संधी लाभली, तर रामदास आठवले यांना देखील तिसऱ्यांदा मंत्री म्हणून देश वासियांची सेवा करण्याची संधी मिळाले असल्याचे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

लोकसभेच्या अटीतटीच्या सामन्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) महायुती सोबत राहिली. लोकाभेच्या निवडणुकीत आठवले हे महायुतीचे स्टार प्रचारक होते. सबंध देशात ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी धावले.

रायगड जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे, मावळ लोकसभा मतदार संघाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभा घेऊन आरपीआय च्या कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेला व सर्व मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन केले. व त्यांची ही मेहनत फळाला आली आणि महायुतीचे दोन्हीही उमेदवार भरघोष मताधिक्यांनी विजयी झाले.

यावेळी सुधागड आरपीआयकडून छ. शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन फटाके फोडून कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरविले. यावेळी तालुका कार्याध्यक्ष भगवान शिंदे, महिलाअध्यक्षा प्रिया वासनिक, जयवंत कांबळे,सचिव आदेश कांबळे, युवाध्यक्ष निशांत पवार, रायगड जिल्हा युवा संपर्कप्रमुख निवास सोनावळे, सतीश गायकवाड, हेमंत गायकवाड,मिलिंद शिंदे, दिलीप मोरे, अमोल कांबळे, विजय वाघमारे, राकेश कांबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 

आश्वासनाची पूर्तता

आरपीआय ला लोकसभेसाठी एकही जागा देण्यात आली नसली तरी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आरपीआय ला महायुती सोबत राहण्याची विनंती करण्यात आली होती आणि या दरम्यान आरपीआयला केंद्रात मंत्रिपद, राज्यात मंत्रिपद व महामंडळावर पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्याचे आश्वासन महयुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले होते. त्यातीलच एक आश्वासन रामदास आठवलेंना केंद्रात मंत्रिपद देऊन पूर्ण केले. त्यामुळे आरपीआय च्या कार्यकर्त्यांमध्ये व आंबेडकरी जनतेमध्ये आनंद व्यक्त होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *