रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे स्हनेसंम्मेलनाचे आयोजन

रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे सनेहसंम्मेलनाचे आयोजन

 

गणेश शिंगाडे गडचिरोली

श्री प्रशिक्षण संस्था, अहेरी द्वारा संचालित रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे दिनांक ३० जानेवारी 2024 रोजी मंगळवारला १३ व्या स्नेह संमेलन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्‌घाटक आर. एस. बालापूरकर सर कमांडंट अधिकारी 9 बी एन सी.आर.पी.एफ प्राणहिता कॅम्प अहेरी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील सैदाणे सर, तह‌सिलदार अहेरी, कालबांधे सर पोलिस निरीक्षक अहेरी, गणेश शिंगाडे मुख्याध्यापक तसेच शाळेचे प्राचार्य उपस्थित होते. शाळेतर्फे घेण्यात आलेल्या अहेरी जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल आणि बक्षिस वितरण या प्रसंगी करण्यात आले. या स्पर्धेत जमा केलेल्या प्रवेश शुल्काची एकूण रक्कम दिव्यांग वि‌द्यालय, बोरी या शाळेला टी. व्ही., फ्री डिश आणि वि‌द्याथ्यांसाठी टी-शर्ट या स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान शालेय वि‌द्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे चार हजार हुन अधिक प्रेक्षकानी आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास दागाम तसेच कु.ज्योती गोदारी यांनी केले बक्षीस समारंभाचे प्रास्ताविक लोकेश दुर्गे यांनी कार्यक्रमाचे आभार शाळेचे प्राचार्य राजेश रामगिरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशवस्वतेसाठी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *