SSC Result 2024 I विठामाता विद्यालयाची यशाची परंपरा कायम.

कुलदीप मोहिते, कराड

विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी एसएससी परीक्षा 2024 चा निकाल 96.35% लागला. विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .विद्यालयात विशेष श्रेणीमध्ये 94 ,प्रथम श्रेणीत 64, द्वितीय श्रेणीत 62 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या.

विद्यालयात प्रथम कुमारी संदे अलिशा अकील 95.80%, द्वितीय कुमारी कदम मनस्वी विनायक 95.60% ,तृतीय कुमारी फडतरे श्रावणी सुरेश 95.20% मार्क .

संस्कृत विषयात कुमारी संदे अलिशा अकील 100 गुण, कुमारी मुल्ला अलीया रियाज 100 गुण ,कुमारी कांबळे सिद्धी केरू 100 गुण मिळाले. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनींचे, मुख्याध्यापिका सौ थोरात यू . ए. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचारी , आणि पालकवर्ग सर्वांचे अभिनंदन श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष व सचिव आदरणीय श्री जयवंत पांडुरंग पाटील तसेच खजिनदार श्री. संजय बदीयाणी आणि आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *