विश्वकर्मा बंशीय लोहार, सुतार, तांबट, सोनार, पाथरवट समाज, भव्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे 10 मार्च  रोजी सातारा येथे अयोजन

विश्वकर्मा बंशीय लोहार, सुतार, तांबट, सोनार, पाथरवट समाज 

भब्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे 10 मार्च  रोजी सातारा येथे अयोजन

मिलिंद लोहार -सातारा

 

 

महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात व तालुक्यातील गावात समाज विखुरलेला आहे. बदलत्या काळानुसार नववधू वराची सुयोग्य सोयरिक जमविताना अनेक अडचणी येत आहेत, यातून समाज प्रबोधन करण्याची गरज ओळखून सातारा येथे रविवार, दिनांक 10 मार्च 2024 दुपारी रोजी १२ ते ४.०० यावेळेत भब्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच बरोबर समाजातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करत असलेल्या समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. 

 

समाजातील वधू व वर यांची नाव नोंदणी वधू च वर यांनी स्वतः मेळाव्यासाठी पुर्ण माहिती व फोटोसह हजर राहणे आवश्यक आहे. सोयरिक जमविताना प्रबोधन करणे, उभवमान्य तडजोड करणे घटस्फोटीत, विधवा, विधूर यांची नाव नोंदणी नाव नोंदणी झालेल्यायेंकी जुळत आलेल्या वधू वरांचे विवाह मेळाव्या दिवशीच होतील नवनियुक्त पद मिळालेल्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या समाज बांधवांचा सत्कार

प्रमुख पाहुणे-

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा जावली विधानसभा

राजुभैया भोसले माजी जि. प. सदस्य

 यांच्या उपस्थितीत समारंभ होणार असल्याचे संस्थापक, अध्यक्ष विश्वकर्मा वधू वर सुचक संस्था सातारा यांच्या वतीने सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *