उदगीर – निलंगा मार्गावर कार – ट्रकचा अपघात; ४ ठार

देवणी : उदगीर-निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि. १०) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार (एमपी ०९ डीई ५२२७) वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून येणारा ट्रक (एमएच २५ जे ७३६५) आणि कारची जोराची धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने कार बाजूला काढण्यात आली. यावेळी देवणी पोलिस ठाण्याचे सपोनि माणिकराव डोके व सहकारी यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *