धावरवाडी (चौरे ) प्रतिनिधी श्रीकांत जाधव
उन्हाळी सुट्ट्या संपल्या की जून महिन्यात शाळा सुरू होतात. त्याचबरोबर नव्याने वर्ग बदलले की वह्या,पुस्तके,दफ्तर अशा विविध समग्रिणा पालकांच्या खिशाला कात्री ही बसत असते. त्यातच सुगीच्या हंगामात शेतीच्या बी बियाणे, खते यासाठी ही शेतकरी वर्गाला सामोरे हे जावे लागत असते. त्याच बरोबर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण हाही जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे.
बाळगून,समाजाचे आपण देणे लागतो. ही भावना उराशी बाळगून धावरवाडीचे पोलीस पाटील श्री.बापूसाहेब शेळके यांनी त्यांचा वाढदिवस गावातील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून साजरा केला.
जिल्हा परिषद शाळा धावरवाडी शाळेतील मुलांना वही,पेन,पेन्सिल व रबर तसेच खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे साहेब गोपनीय चे श्री निलेश पवार,दादा धावरवाडी गावातील माजी सैनिक श्री कृष्णत शेळके, अशोक कदम,श्री दत्तात्रय मोहिते, गुरुजी कृष्णत चंदुगडे,ग्रामपंचायत कर्मचारी लालासो वेचलेकर,अंगणवाडी सेविका कोमल चंदुगडे, अंगणवाडी मदतनीस सुनिता कदम,कुमारी श्रेया बापूसाहेब शेळके आणि त्यांचे मित्र गोडवाडीचे पोलीस पाटील श्री समीर घाडगे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच मुलांच्या कला गुणांना वाव मिळण्याकरिता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.