सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान

सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान

 

कुलदीप मोहिते कराड

 

सोमवार दी.1/4/2024 रोजी कराड तालुक्यातील मौजे निगडी गावचे सुपुत्र हवालदार सुनील घोलप हे 20 वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा त्यांचे जन्मगावी मौजे निगडी तालुका कराड येथे संपन्न झाला. त्यांचा सन्मान सैनिक फेडरेशनचे वतीने व निगडी गावच्या आजी/ माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन जिल्हा सैनिक फेडरेशन अध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी माजी सैनिक यांचे वतीने करण्यात आला.

 

     या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन हे उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमा मध्ये मनोगत व्यक्त करताना म्हटले की सैनिक हा कधी रिटायर होत नाही.तो सैन्या मधून रिटायर झाला असला तरी तो समाजामध्ये काम करत असताना अनेक संघर्ष करावे लागतात व आपले असणारे बोनस आयुष्य समाजामध्ये नवीन युवा पिढी ला मार्गदर्शन करून सैन्य सेवेत भरती होण्यासाठी भारत मातेची सेवा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. व शोषित, वंचित समाजाला मदत करावी व सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सक्षम करण्यासाठी आपण योगदान द्यावे व सैनिक फेडरेशन बरोबर काम करावे.सातारा जिल्हा हा सैनिकांचा शूरवीरांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आजी /माजी सैनिक , शहीद जवान कुटुंबीय हे सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर निरनायक भूमिकेत आहेत तरी सर्व सैनिकांनी सैनिकांच्या हक्कासाठी एकत्र यावे संघटित रहावे असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. व माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांना शासनाकडून मिळणारी अर्थिक मदत व मिळणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *