कोडोली येथे स्नेहमेळावा व नागरी सत्कार उत्साहात

कोडोली येथे स्नेहमेळावा व नागरी सत्कार उत्साहात

कोडोली: सातारा निवासी तारगांवकर यांचा स्नेहमेळावा व नागरी सत्कार

 

साई सम्राट कार्यालय कोडोली येथे आनंदाने पार पास पडला. तारगांव येथून सातारा मध्ये शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायस कामधंदया निमित्त आलेल्या ८५ कुटुंब असून त्यापैकी ४० कुटुंब एकत्रित येऊन स्नेहमेळावा व नागरी सत्कार सोहळा आयोजीत केला होता. त्यासाठी विनायक भोसले यांच्या संकल्पनेतून कुटुंब एकत्रीत करून आपल्या समस्या सोडविता येतील गेल्या २ ते ३ पिढ्यातील अंतर कमी करून गावाविषयी आपुलकी प्रेम राहावे म्हणून आयोजित केला. तसेच चालू वर्षी मुंबई मनपा सेवानिवृत विनायक भोसले, शिवाजी पवार उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन, इतिहास संशोधक प्रा. डॉ. पांडुरंग शिंदे, मनोज बारटक्के प्रशासकीय अधिकारी वाई, विठ्ठल स्वामी, रोहिणी सोनावणे (A.P.I), डॉ. श्रुती देशमाने यांचा सत्कार करणेत आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी यांनी केले. अध्यक्ष राजेंद्र देशमाने उपाध्यक्ष संजय पडवळ, सचिव प्रकाश कापसे खजिनदार नेताजी पाटील व रमेश सोनावले तसेच सदस्य – सुनिल महामुलकर, सतीश भोसले, भगवान मोरे, आबाजी भोसले, योगेश महाडिक, विशाल स्वामी, गणेश कोकीळ, सतीश भोसले, रवींद्र तावरे व समस्त तारगावकर उपस्थित होते. यावेळी सर्वांचे सहकार्याने भविष्यात एकत्रित येऊन समाजकार्य करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. आभार विनायक भोसले यांनी मांडले.